दत्तात्रय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : तालुक्यात पैनगंगा नदी पात्रातील लिलाव झालेल्या रेती घाटांवरुन नियमांना तिलांजली देत बेसुमार रेती उपसा केला जात आहे. स्थानिक तलाठी व मंडळ अधिकारी मूग गिळून असल्याने पर्यावरणाचा ºहास होऊन कोट्यवधींच्या गौण खनिजाची कंत्राटदार लूट करीत आहे.पैनगंगा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात रेती उपसा केला जात आहे. रेती उपसा करण्यासाठी नियम आहेत. मात्र त्यांना डावलून अनेक कंत्राटदार रेतीचा वारेमाप उपसा करीत आहे. अलिकडच्या काळात कााही राजकीय मंडळींनी रेती व्यवसायात उडी घेतल्याने ठिकठिकाणी रेतीची साठेबाजी केली जात आहे. रेती माफियांनी महसूल प्रशासनावर कुरघोडी केल्याचे चित्र तालुक्यात निदर्शनास येत आहे.तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या पात्रातील लिलाव झालेल्या रेती घाटांतून जिल्हा खनिकर्म विभागाने नेमून दिलेल्या सर्वे नंबरमधून किती ब्रास रेतीचे उत्खनन करायचे, याबाबत बंधने लादलेली आहे. मात्र लिलाव झालेल्या ठिकठिकाणच्या रेती घाटांतून अहोरात्र रेतीचे उत्खनन केले जात आहे. त्या श्ेकडो ब्रास रेतीचा शहरातील ढाणकी रोड, रहिमनगर, चालगणी रस्त्यावरील मारोती मंदिर परिसरात साठा करण्यात आला आहे. रेतीचे साठे सामान्य नागरिकांना दिसत आहे. मात्र महसूल प्रशसनाची तयाकडे डोळेझाक होत आहे.तालुक्यातील वजनदार नेते मंडळीसह यवतमाळ येथील एका राजकीय व्यक्तीने तालुक्याीतल रेती व्यवसायात उडी घेतली आहे. त्यामुळे महसूल विभाग कारवाईबाबत नरमाईची भूमिका घेत असल्याचा आरोप शेख निसार शे. इब्राहिम यांच्यासह अन्य तिघांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या तक्रारीतून केला आहे. राजकीय मंडळींचा रेती तस्करीत सहभाग वाढल्याने प्रशासनावर आपोआप दबाव पडतो.तलाठी अहवाल प्राप्त होताच कारवाई !रेती घाट लिलाव झाल्यापासून आत्तापर्यंत १५ प्रकरणात १२ वाहनांवर कारवाई झाली. त्यांना सुमारे १७ लाख ३६ हजार ५२९ दंड ठोठावण्यात आला. अद्यापही नऊ वाहने महसूल कार्यालयात जमा आहे. तालुक्यातील तिवडी, चालगणी, ढाणकी तसेच सरवरासह उमरखेड शहरातही रेती विक्रेत्यांनी साठे केले आहे. त्यांचा शोध घेत सविस्तर तलाठी अहवाल प्राप्त होताच त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे तहसीलदार रुपेश खंडारे यांनी सांगितले. काही रेती विक्रेत्यांनी घरकूल लाभार्थ्यांना रेती विकत असल्याचा कांगावा केला. त्यासाठी रेती वाहतूक करताना काही वाहने आढळली. हा अवैध प्रकार असल्याचे सांगून खंडारे यांनी अश वाहनांवरसुद्धा कारवाई केल्याचे स्पष्ट केले.
उमरखेड तालुक्यात पैनगंगा नदीच्या पात्रातून बेसुमार रेतीचा अवैध उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 21:18 IST
तालुक्यात पैनगंगा नदी पात्रातील लिलाव झालेल्या रेती घाटांवरुन नियमांना तिलांजली देत बेसुमार रेती उपसा केला जात आहे. स्थानिक तलाठी व मंडळ अधिकारी मूग गिळून असल्याने पर्यावरणाचा ºहास होऊन कोट्यवधींच्या गौण खनिजाची कंत्राटदार लूट करीत आहे.
उमरखेड तालुक्यात पैनगंगा नदीच्या पात्रातून बेसुमार रेतीचा अवैध उपसा
ठळक मुद्देनियमांना तिलांजली । राजकीय मंडळींचा रेती तस्करीत शिरकाव, महसूलचे अभय