कोळंबी फाट्याजवळ अवैध सागवान पकडले

By Admin | Updated: October 24, 2015 02:31 IST2015-10-24T02:31:53+5:302015-10-24T02:31:53+5:30

हिवरी वनपरिक्षेत्रात अकोला बाजार रोडवरील कोळंबी फाट्यावर वनकर्मचारी अवैध सागवान पकडले.

The illegal seas caught near prawn straw | कोळंबी फाट्याजवळ अवैध सागवान पकडले

कोळंबी फाट्याजवळ अवैध सागवान पकडले

आरोपी पसार : दीड लाखाचा मुद्देमाल जप्त
हिवरी : हिवरी वनपरिक्षेत्रात अकोला बाजार रोडवरील कोळंबी फाट्यावर वनकर्मचारी अवैध सागवान पकडले. मात्र अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले. यावेळी चार चाकी वाहनासह दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर व त्यांच्या कर्मचाऱ्यांना लोणी बीट अंतर्गत सागवान कटाई करून नेताना काही जण दिसले. त्यांनी जंगलाच्या दिशेने धाव घेताच आरोपीने मारोती व्हॅन (एमएच ३०/५४१२) व कटाई केलेला सागवान माल तिथेच सोडून पळून गेले. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी गाडीसह माल ताब्यात घेतला. रात्रीच हा माल हिवरी वनविभागाच्या आवारात जप्त केला.
याप्रकरणी भारतीय वनअधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून, आरटीओ कार्यालयाशी पत्रव्यवहार करून गाडी मालकाच्या नावाची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आरोपींना
लवकरच अटक करण्यात येईल
असे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी सांगितले.
ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर, क्षेत्र सहाय्यक ए.एस. शिरभाते आदींनी केली. (वार्ताहर)

Web Title: The illegal seas caught near prawn straw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.