लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहराच्या सभोवताल अवैध रेतीसाठा करून रेती तस्करांनी कृत्रिम रेती घाट तयार केले आहे. रेती माफियांचे कारनामे ‘लोकमत’ने वृत्ताच्या माध्यमातून मांडले. याची दखल घेऊन महसूल प्रशासनाने धाडसत्र राबविले. तब्बल ७५२ ब्रास रेतीचा अवैध साठा जप्त करून तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले.शहरातील तायडेनगर परिसरात तसेच डोर्ली येथील सर्वे नं. ६ मध्ये अवैध रेतीचा साठा करण्यात आला होता. माफिया मो. अनिस मो. हनीफ (३०) रा. रचनानगर पांढरकवडा रोड याच्याविरुद्ध तहसीलदार कुणाल झाल्टे यांच्यावतीने रेती चोरी करून साठविल्याची तक्रार देण्यात आली. त्यावरून शहर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तर अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोसा येथील जिंद्राननगरमध्ये २०१.४९ ब्रास रेतीचा अवैध साठा जप्त केला. भोसा येथील तायडे यांच्या शेतातून १०२.७३ ब्रास आणि ६७.२८ ब्रास असे दोन रेतीचे अवैध साठे जप्त केले. या प्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी मो. अनीस मो. हनीफ आणि मन्सूर दाऊद सय्यद (२७) रा. मोरेनगर भोसा याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना घराच्या बांधकामासाठी रेती मिळणे कठीण झाले आहे. दुसरीकडे रेती माफिया बंदी असतानाही रेतीचे उत्खनन करून त्याचा साठा करीत आहे. हीच रेती चौपट दराने घराच्या बांधकामासाठी विकली जात आहे. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. अक्षरश: माफियांची दादागिरी असून लूट सुरू आहे. महसूल बुडत असल्यानेही शासनाचे नुकसान होते. तर दुसरीकडे सामान्य जनतेच्या खिशावर भार पडत आहे. रेती माफियांच्या मुसक्या आवळून अवैध रेतीसाठा गरिबांच्या घरकुल बांधकामासाठी वितरित केला जावा, अशी मागणी होत आहे.अवैध रेतीसाठा व रेती तस्करांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. यात कुणाचीही गय करण्यात येणार नाही. तशा सूचनाही मंडळ अधिकारी, तलाठ्यांना दिल्या आहेत.- कुणाल झाल्टे,तहसीलदार, यवतमाळ
यवतमाळात ७५२ ब्रास रेतीचा अवैध साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 06:00 IST
शहरातील तायडेनगर परिसरात तसेच डोर्ली येथील सर्वे नं. ६ मध्ये अवैध रेतीचा साठा करण्यात आला होता. माफिया मो. अनिस मो. हनीफ (३०) रा. रचनानगर पांढरकवडा रोड याच्याविरुद्ध तहसीलदार कुणाल झाल्टे यांच्यावतीने रेती चोरी करून साठविल्याची तक्रार देण्यात आली. त्यावरून शहर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तर अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोसा येथील जिंद्राननगरमध्ये २०१.४९ ब्रास रेतीचा अवैध साठा जप्त केला.
यवतमाळात ७५२ ब्रास रेतीचा अवैध साठा जप्त
ठळक मुद्देतहसीलदारांची कारवाई : अवधूतवाडी व शहर ठाण्यात तिघांवर गुन्हे