वडकी परिसरात गौण खनिजाचे अवैध उत्खनन
By Admin | Updated: July 14, 2017 01:48 IST2017-07-14T01:48:46+5:302017-07-14T01:48:46+5:30
परिसरात गौण खनिजाचे अवैधरित्या बेसुमार खनन सुरू आहे. या प्रकारातून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.

वडकी परिसरात गौण खनिजाचे अवैध उत्खनन
लोकमत न्यूज नेटवर्क
वडकी : परिसरात गौण खनिजाचे अवैधरित्या बेसुमार खनन सुरू आहे. या प्रकारातून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी मात्र याविषयी अनभिज्ञ कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राळेगाव तालुक्यातील वडकी, किन्ही(जवादे) परिसरात गेली अनेक दिवसांपासून रेतीची अवैध तस्करी सुरू आहे. किन्ही(जवादे) येथील सर्वे नं.१०१ च्या मुरुमाची रॉयल्टी एका व्यावसायिकाने फाडली आहे. तेथून पोकलँडद्वारे मुरुमाचे खनन सुरू आहे. वास्तविक या सर्वे नंबरमध्ये पोकलँडद्वारे उत्खननाची परवानगी नाही. तरीही महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी दुर्लक्ष करत आहेत.
वडकी परिसरात अनेक दिवसांपासून रेतीची तस्करी टिप्परने सुरू आहे. चार व पाच ब्रास टिप्परला परवानगी नाही. अवैधरित्या भरलेले टिप्पर खैरी, वडकी या मार्गाने भरधाव धावतात. या प्रकारात झालेल्या अपघातामध्ये अनेकांना अपंगत्व आलेले आहे. खैरी येथे झालेल्या अपघातात एक जण ठार, तर एक गंभीर जखमी झाला. तरीही या प्रकारावर नियंत्रण आणले जात नाही.