शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हात लाखोंचा कर चुकविणाऱ्या कंत्राटदारांवरील कारवाईकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 05:00 IST

तालुक्यात तसेच लगतच्या शहरांना जोडणाऱ्या राष्ट्रीय, राज्य मार्गासह शेकडो किलोमीटरवर रस्त्यांचे काँक्रिटीकरण, डांबरीकरण, पुलांचे बांधकाम सुरू आहे. त्यावर मुरूम, डांबर, गिट्टी, रेतीसह विविध साहित्याची वाहतूक, खोदकाम व इतर कामाकरिता ट्रक, मालवाहू, रोडरोलर, जेसीबी, पोकलँड, मिक्सर आदी जवळपास १०० वाहने धावतात.

मुकेश इंगोलेलोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्यात रस्ते बांधकामांवर नियम डावलून वाहने वापरली जात आहे. कंत्राटदार लाखो रुपयांचा वाहन कर चुकवित आहे. मात्र, संबंधितांकडून वाहन तपासणी, कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तालुक्यात तसेच लगतच्या शहरांना जोडणाऱ्या राष्ट्रीय, राज्य मार्गासह शेकडो किलोमीटरवर रस्त्यांचे काँक्रिटीकरण, डांबरीकरण, पुलांचे बांधकाम सुरू आहे. त्यावर मुरूम, डांबर, गिट्टी, रेतीसह विविध साहित्याची वाहतूक, खोदकाम व इतर कामाकरिता ट्रक, मालवाहू, रोडरोलर, जेसीबी, पोकलँड, मिक्सर आदी जवळपास १०० वाहने धावतात. परंतु यातील अनेक वाहनांचे इन्शुरन्स, फिटनेस, पासिंगसह वाहतुकीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे नसल्याचे सांगितले जाते. एका वाहनाला वर्षाला इन्शुरन्स ५५ हजार, फिटनेस, पासिंग व इतर ६० हजारांच्या जवळपास खर्च येतो. त्याऐवजी संगनमतातून एका वाहनाचे महिन्याकाठी ३ हजारात ‘सेटिंग’ झाल्याची चर्चा आहे. हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे कर चुकवेगिरीचा आकडा लाखोंच्या घरात आहे. यापेक्षाही गंभीर म्हणजे अनेक वाहने छत्तीसगड, तेलंगणा, झारखंड आदी प्रांतातील आहे. त्यांची ‘एनओसी’ घेतली की नाही, हे तपासणे गरजेचे आहे. यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये बातमी प्रकाशित होताच येथील पोलीस वाहतूक नियंत्रण उपशाखेने दोन बांधकाम कंपन्यांना नोटीस बजावली. त्यांना वाहनांचे कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले. आरटीओ कार्यालयाकडून फ्लाइंग स्कॉटकडून चौकशी करण्यात येईल, असे उत्तर मिळाले. परंतु कारवाईच्या नावाखाली केवळ खानापूर्ती केली जाते. परिणामी कंत्राटदारांना संधी मिळाली. एका कंपनीने काही वाहने शेजारच्या जिल्ह्यात हलविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे. वेळेत तपासणी न झाल्यास शासनाच्या महसुलाचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे तातडीने कारवाईची मागणी आहे.

हा घ्या पुरावा, आणखी काय हवेएका बांधकामावरील वाहनाची एम परिवहन ॲपवर माहिती घेतली असता त्या वाहनाचे फिटनेस २१ डिसेंबर २०१८, तर टॅक्स १७ जुलै २०१८ पर्यंत व्हॅलिड असल्याचे दिसून आले. त्यावरून हे वाहन गेल्या तीन वर्षापासून टॅक्स न भरताच वापरले जात असल्याचे स्पष्ट होते. एवढा पुरावा असताना संबंधितांकडून चौकशीत वेळ घालविला जात आहे. त्यामुळे यात कुठे तरी पाणी मुरत असल्याची चर्चा आहे.

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस