प्लास्टिक कॅरीबॅग वापराल तर फौजदारी
By Admin | Updated: August 6, 2015 00:04 IST2015-08-06T00:04:26+5:302015-08-06T00:04:35+5:30
५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापराल तर खबरदार! उमरखेड नगरपरिषदेने शहरात प्लास्टिक कॅरिबॅग वापर बंद करण्याचे निर्देश दिले असून, .....

प्लास्टिक कॅरीबॅग वापराल तर फौजदारी
उमरखेड : ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापराल तर खबरदार! उमरखेड नगरपरिषदेने शहरात प्लास्टिक कॅरिबॅग वापर बंद करण्याचे निर्देश दिले असून, या कॅरीबॅगचा वापर करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
उमरखेड नगरपरिषदेने शहरातील स्वच्छतेचा प्रश्न उपस्थित करत कॅरीबॅगच्या वापरावर बंदी आणली आहे. नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्लास्टिक पिशव्यांचे नियम २००६ व केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व हाताळणी अधिनियम २०११ नुसार नगरपलिका क्षेत्रात राज्य शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडी आणि ८ बाय १२ इंच आकाराच्या
पिशव्या वापराला बंदी घातली
आहे.
प्लास्टिक वापरामुळे मानावाच्या व प्राण्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. शहरातील नाल्याही तुंबत आहे.
त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे. हा सर्व प्रकार टाळण्यासाठी प्लास्टिक पिशव्या वापरावर बंदी आणण्यात आली आहे. उमरखेड शहरात त्यांची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार असून, या उपर कोणीही प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर केल्यास त्यांच्यावर फौजदारी करण्याचा इशारा नगरपरिषदेने दिला आहे. (शहर प्रतिनिधी)