लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपालिका हद्दीत नव्यानेच समाविष्ट झालेल्या लोहारा परिसरातील नागरिकांना मालमत्ता कराच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या भागात यवतमाळ नगरपालिकेची शाळाच नसतानाही नागरिकांना शिक्षण कर आकारण्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.जुन्या लोहारा ग्रामपंचायतीच्या परिसरात राऊत नगर, विद्याविहार कॉलनी, शुभम कॉलनी, सानेगुरूजी नगर भाग १, सानेगुरुजी नगर भाग २, राधा कृष्ण नगरी, सूर्याेदय नगर अशा विविध नव्या वसाहती वसल्या आहेत. लोहारा ग्रामपंचायतीसोबतच हा परिसरही दीड वर्षापूर्वी यवतमाळ नगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झाला. नुकत्याच या परिसरात पालिकेने मालमत्ता कराच्या नोटीस बजावल्या आहेत. त्यावर अनेकांची नाराजी असताना शिक्षण करावरून संताप वाढत आहे.संपूर्ण लोहारा परिसरात यवतमाळ नगरपरिषदेची एकही शाळा नाही. एकमेव जिल्हा परिषदेची शाळा असून तीही अद्याप पालिकेकडे वर्ग करण्यात आलेली नाही. तरीही पालिकेने ८०० ते १ हजार रुपयांपर्यंतचा शिक्षण कर या भागातील नागरिकांवर आकारलेला आहे. रस्ते, नाल्या, घंटागाड्या अशी कोणतीही सुविधा न देता पालिकेने मालमत्तांचे मूल्यांकन करून घेतले. आता कर आकारणीही करण्यात आली आहे. मात्र सुविधा देण्याबाबत पालिकेचे धोरण उदासीन आहे. मालमत्तांच्या मोजमापातही चुका असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहे.घरमालकाऐवजी चक्क भाडेकरूला नोटीसलोहारा परिसरातील नागरिकांना आलेल्या कर आकारणीच्या नोटीसांमध्ये अनेक चुका आहेत. घर मालकाऐवजी चक्क भाडेकरूच्या नावाने नोटीस आल्या आहेत. त्यामुळे घरमालक मालमत्ता हातून जाते की काय, या भीतीने हादरले आहेत. अनेकांच्या नावांमध्ये चुका असणे हा तर सर्वसामान्य प्रकार मानला जात आहे. घर, रिकामा प्लॉट यांच्या मोजमापात चुकाच चुका आहेत. या सर्व प्रकारांविरुद्ध आम्ही नगरपालिकेकडे दाद मागणार आहोत. ग्रामपंचायत नगरपालिकेमध्ये विलीन करताना आम्ही ठेवलेल्या अटींचे उल्लंघन केले जात आहे, अशी माहिती लोहारा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तुषार देशमुख यांनी दिली.
शाळाच नाही, तरी आकारला शिक्षण कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 23:44 IST
नगरपालिका हद्दीत नव्यानेच समाविष्ट झालेल्या लोहारा परिसरातील नागरिकांना मालमत्ता कराच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या भागात यवतमाळ नगरपालिकेची शाळाच नसतानाही नागरिकांना शिक्षण कर आकारण्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
शाळाच नाही, तरी आकारला शिक्षण कर
ठळक मुद्देनगरपरिषदेचा कारभार : हद्दवाढीची डोकेदुखी, नोटीसमुळे लोहारावासी बुचकळ्यात