पटसंख्या कमी असल्यास शिक्षकांचे वेतन कापणार

By Admin | Updated: July 1, 2015 00:18 IST2015-07-01T00:18:09+5:302015-07-01T00:18:09+5:30

जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत पटसंख्येवर नोंदविण्यात आलेले विद्यार्थी दर दिवशी शाळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे.

If the number of teachers is less then the teachers will be paid | पटसंख्या कमी असल्यास शिक्षकांचे वेतन कापणार

पटसंख्या कमी असल्यास शिक्षकांचे वेतन कापणार

सचिंद्र प्रताप सिंह : शाळांना देणार अकस्मात भेटी
यवतमाळ : जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत पटसंख्येवर नोंदविण्यात आलेले विद्यार्थी दर दिवशी शाळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे. ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी आढळून येईल, अशा शाळेतील संबंधीत शिक्षकांचे वेतन कपात करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.
जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला त्यानंतर त्यानिमित्त जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंग, माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी शाळांना भेटी दिल्या. या भेटीत गोधणी रोड येथील जिल्हा परिषद माजी शासकीय मुलांच्या शाळेस भेट दिली असता तेथे विद्यार्थ्यांची उपस्थिती फारच कमी आढळून आली. या उपस्थितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला.
या भेटीत जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य मान्यवरांनी शाळेतील प्रत्येक वर्गखोली तसेच साहित्याची पाहणी केली. शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असल्यास संबंधित शिक्षकांचे वेतन कपात करण्याचे निर्देश त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले. शासकीय मुलांच्या शाळेत अनेक साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना धारेवर धरले. मागील तीन वर्षांमध्ये प्राप्त डेक्स व बेंचचे आॅडीट करून त्याचा अहवाल तत्काळ सादर करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.
शाळांना पुढे वारंवार भेटी दिल्या जाणार आहे. या भेटीत विद्यार्थ्यांची कमी उपस्थिती दिसता कामा नये. ७५ टक्केपेक्षा कमी उपस्थिती आढळून आल्यास संबंधित शिक्षकांसह मुख्याध्यापकाचे वेतन कपात करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी या भेटीत इयत्ता १२ वी उर्दु माध्यमांच्या वर्गालाही भेट दिली. या भेटीत ६५ पैकी ६० विद्यार्थी उपस्थित आढळून आले. वर्गशिक्षिका सबाहन तस्नीम या विद्यार्थ्यांचे स्वागत करीत असल्याचे दिसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर केंद्रीय विद्यालयासही भेट देऊन त्यांनी पाहणी केली तसेच आवश्यक सूचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)

कामचुकारांमध्ये धास्ती
जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना भेटी देण्याचा सपाटा लावला आहे. तसेच त्या संबंधी काही आवश्यक सूचनाही दिल्या आहेत. त्यामुळे कामचुकार शिक्षक, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या भेटींचा चांगलाच धसका घेतला आहे. तर दुसरीकडे प्रामाणिक शिक्षक व कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीचे स्वागतच केले आहे.

Web Title: If the number of teachers is less then the teachers will be paid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.