सलूनचालकाचा मुलगा बनला ‘आयआयटीयन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 21:44 IST2018-09-03T21:43:47+5:302018-09-03T21:44:06+5:30
वडिलांचा परंपरागत सलूनचा व्यवसाय, आई गृहिणी. अशा सामान्य कुटुंबातील मुलाने आपले ध्येय उराशी जोपासत लर्निंग वीथ अर्निंग करत उच्चदर्जाच्या महाविद्यालयातून आयआयटीयन होण्याचे स्वप्न साकारले.

सलूनचालकाचा मुलगा बनला ‘आयआयटीयन’
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वडिलांचा परंपरागत सलूनचा व्यवसाय, आई गृहिणी. अशा सामान्य कुटुंबातील मुलाने आपले ध्येय उराशी जोपासत लर्निंग वीथ अर्निंग करत उच्चदर्जाच्या महाविद्यालयातून आयआयटीयन होण्याचे स्वप्न साकारले.
बालाजी सोसायटीत राहणाऱ्या अनिकेत गजानन धावतोडे याने आपले बारावीपर्यंतचे शिक्षण यवतमाळातच पूर्ण केले. त्यानंतर औरंगाबाद येथून फाईन आर्टमध्ये पदवी घेतली. त्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रिजमध्ये सिनिअर व्हिज्यूअलाझर म्हणून नोकरी केली. नोकरीवर असतानाच त्याने आयआयटीयन होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तब्बल तीनवेळा त्याने ‘सीडी’ची प्रवेश परीक्षा दिली. तिसºया प्रयत्नात आयआयटी हैद्रराबाद येथे त्याला प्रवेश मिळाला. दोन वर्षाचा ‘मास्टर ईन डिझाईन’ हा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. वडील गजानन धावतोडे यांचा सलूनचा व्यवसाय तर, आई रिता नगरसेवक आहे. धाकटी बहीण मंजरी हैदराबाद येथे ‘आयआयटी-जी’ची तयारी करत आहे.
राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव
अनिकेतचा हैदराबाद येथे पाच आॅगस्ट रोजी महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद, आंध्रप्रदेश व तेलंगाणाचे राज्यपाल इ.एस.एल. नरसिंहा, तेलंगणाचे उपमुख्यमंत्री मोहम्मद महमुद अली यांच्या उपस्थितीत गौरव झाला. अनिकेत आता अमेरिकेतील कंपनीत ‘प्रॉडक्ट अॅनालिस्ट’ म्हणून कार्यरत आहे.