चिल्ली येथे वीज पडून पती ठार, पत्नी गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 17:46 IST2020-09-03T17:46:03+5:302020-09-03T17:46:09+5:30
पावसामुळे झाडाचा आश्रय घेतलेल्या एका दाम्पत्यावर वीज कोसळली.

चिल्ली येथे वीज पडून पती ठार, पत्नी गंभीर
यवतमाळ : महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथून जवळच असलेल्या चिल्ली (ई) येथील शेतशिवारात गुरुवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडासह पावसाला सुरुवात झाली. शेतात निंदण करीत असताना अचानक आलेल्या पावसामुळे झाडाचा आश्रय घेतलेल्या एका दाम्पत्यावर वीज कोसळली. यात पतीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली.
विलास भोमसिंग राठोड (४५) असे मृत शेतकºयाचे नाव आहे. त्यांची पत्नी ललिताबाई (४०) या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी सवना ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यांच्याकडे दोन एकर शेती आहे. विलास राठोड यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.