शिकाऱ्याच्या हातावर मोराने दिल्या तुरी

By Admin | Updated: March 13, 2015 02:26 IST2015-03-13T02:26:55+5:302015-03-13T02:26:55+5:30

नेर तालुक्यात वन्यजीवांच्या शिकारीत वाढ झाली असून, आज एका मोराने शिकाऱ्याच्या हातून पळ काढला.

The hunter turned his hand on the hand | शिकाऱ्याच्या हातावर मोराने दिल्या तुरी

शिकाऱ्याच्या हातावर मोराने दिल्या तुरी

नेर : नेर तालुक्यात वन्यजीवांच्या शिकारीत वाढ झाली असून, आज एका मोराने शिकाऱ्याच्या हातून पळ काढला. नेर शहरातील मुख्य मार्गावरून मोर उडताना अनेकांनी बघितला. वनविभागाने या मोराला ताब्यात घेऊन जंगलात सोडले.
नेर शहरातील कोणत्यातरी शिकाऱ्याने मोराला जंगलातून पकडून आणले. मात्र या मोराने शिकाऱ्याच्या हातातून पळ काढला. माळीपुरा परिसरातून हा मोर बाजारपेठेत उडत आला. त्यामुळे जंगलातील मोर शहरात कसा असे म्हणत अनेकांनी त्याचा पाठलाग केला. मात्र तो हाती लागला नाही. अखेर वनपरिक्षेत्र अधिकारी चौटाई वनपाल शेखर साठे, ए.एम. मुनेश्वर, ए.बी. मोहोड, महालक्ष्मी कापडे, हरिश्चंद्र राठोड, महादेव रंगारी, शेखर येलोरे आदींनी पकडून त्याला जंगलात सोडले. या मोराला कुठेही जखम झालेली नव्हती. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The hunter turned his hand on the hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.