शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

अवनीची शिकार करणाऱ्या नवाबचा गावकरी करणार सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 16:04 IST

अवनी वाघिणीला मारणारा शिकारी नवाब याच्याविरोधात देशभरात रोष व्यक्त केला जात आहे. मात्र  असे असले तरी त्याच नवाबचा राळेगाव तालुक्यातील गावक-यांकडून संयुक्त सत्कार केला जाणार आहे. 

यवतमाळ - नरभक्षक असल्याच्या संशयावरून अवनी वाघिणीच्या करण्यात हत्येबाबत प्राणीप्रेमींकडून तीव्र संताप होत आहे. या वाघिणीला मारणारा शिकारी नवाब याच्याविरोधात देशभरात रोष व्यक्त केला जात आहे. मात्र  असे असले तरी त्याच नवाबचा मंगळवारी, १३ नोव्हेंबरला सायंकाळी राळेगाव तालुक्यातील सावरखेड या गावात लगतच्या काही गावक-यांकडून संयुक्त सत्कार केला जाणार आहे. अवनी या वाघिणीने पांढरकवडा, कळंब, राळेगाव या तीन तालुक्यांमध्ये धुमाकूळ घातला. अवघ्या काही महिन्यात एक-दोन नव्हे तर तब्बल १३ शेतकरी, शेतमजुरांची शिकार केली. या १३ जणांच्या मृत्यूमुळे त्यांचे कुटुंब उघडे पडले, कुटुंबातील सदस्यांवर आभाळ कोसळले. अवनीच्या दहशतीमुळे तीन तालुक्यातील वाघग्रस्त गावच्या नागरिकांनी गेल्या काही महिन्यांपासून शेतावर जाणे बंद केले होते. सायंकाळनंतर ग्रामीण भागातील रस्ते ओस पडत होते. अखेर हैदराबाद येथील प्रसिद्ध शिकारी नवाब व त्याच्या मुलाने अवनीला गोळी घालून ठार करून या गावक-यांची दहशतीतून सुटका केली. या नवाबला देशभरातील वन्यजीवप्रेमींकडून तीव्र विरोध होत असला तरी पांढरकवडा वनविभागांतर्गत वाघग्रस्त गावातील सर्वच नागरिक मात्र त्याच्यावर खूप खूश आहेत. म्हणूनच या गावक-यांनी मंगळवारी नवाब व त्याच्या मुलाचा सत्कार आयोजित केला आहे. लगतच्या वाघग्रस्त अनेक गावांनी एकत्र येऊन या सत्काराचे आयोजन केले आहे.

टॅग्स :Avani Tigressअवनी वाघीणYavatmalयवतमाळMaharashtraमहाराष्ट्र