जिल्हा परिषदेसमोर उपोषण आंदोलन
By Admin | Updated: December 3, 2015 02:57 IST2015-12-03T02:57:04+5:302015-12-03T02:57:04+5:30
विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हा परिषदेसमोर उपोषण मंडपाचा पाडाव पडला आहे. घरकुुलाच्या मागणीसाठी आदिवासी बांधवानी उपोषण सुरू केले आहे.

जिल्हा परिषदेसमोर उपोषण आंदोलन
घरकुलासाठी ठिय्या : शिक्षकांच्या उपोषणाचाही तिसरा दिवस
यवतमाळ : विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हा परिषदेसमोर उपोषण मंडपाचा पाडाव पडला आहे. घरकुुलाच्या मागणीसाठी आदिवासी बांधवानी उपोषण सुरू केले आहे. एकस्तर वेतनश्रेणीसाठी शिक्षकांनी सुरू केलेल्या उपोषणाचा तिसरा दिवस उजाडला आहे.
झरगड येथील आदिवासी बांधवांनी घरकुलासाठी राळेगाव पंचायत समितीसमोर उपोषण केले होते. त्यावेळी आमदार डॉ. अशोक उईके यांनी दिलेले आश्वासन पूर्ण झाले नाही. पालकमंत्र्यांच्या जनता दरबारातही हा प्रश्न मांडण्यात आला. तरीही प्रश्न कायम असल्याने ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. अजाबराव आत्राम, बाबाराव पंधरे, नर्मदा चांदेकर, भारत मेश्राम, भारत किन्हाके, सुमिता कमराम, कलावती अंबाखाये, दादाराव कोवे, दिगंबर आत्राम, कमला कोवे, विलास आत्राम आदी उपोषणात सहभागी झाले आहे.
प्राथमिक शिक्षक संघाने जिल्हाध्यक्ष राजुदास जाधव यांच्या नेतृत्वात एकस्तर वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे. महाराष्ट्र राज्य आरोग्य नर्सेस संघटनेचे अध्यक्ष अशोक जयसिंगपूरे यांनी उपोषणाला पाठिंबा देत ते ३ डिसेंबरपासून बेमुदत उपोषण करणार आहेत. राजुदास जाधव, विनोेद गोडे, गौतम कांबळे, राजेंद्र पिंपळशेंडे, अनिल सरतावे, आसाराम चव्हाण, सुनील राठोड, सुधाकर राऊत आदी उपोषणात सहभागी झाले आहेत. (शहर वार्ताहर)