शेकडो शिधापत्रिका जाळल्याची तक्रार
By Admin | Updated: September 25, 2015 03:20 IST2015-09-25T03:20:06+5:302015-09-25T03:20:06+5:30
तालुक्यातील साई ईजारा येथील एका स्वस्त धान्य दुकानदाराने शेकडो शिधापत्रिका स्मशानभूमित जाळल्याची तक्रार बिरसा मुंडा ब्रिगेडने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

शेकडो शिधापत्रिका जाळल्याची तक्रार
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : बिरसा मुंडा ब्रिगेडची कारवाईची मागणी
महागाव : तालुक्यातील साई ईजारा येथील एका स्वस्त धान्य दुकानदाराने शेकडो शिधापत्रिका स्मशानभूमित जाळल्याची तक्रार बिरसा मुंडा ब्रिगेडने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या प्रकरणी तात्काळ चौकशी करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
साई ईजारा येथे दोन स्वस्त धान्य दुकानदार आहे. त्यापैकी एकाने गावातील काही नागरिकांच्या शिधापत्रिका आपल्या स्वत:जवळच गोळा करून ठेवल्या आहेत. या शिधापत्रिकेवर मिळणारे धान्य काळ््या बाजारात विकत असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. सदर प्रकरण आपल्या अंगलट येईल म्हणून गत आठवड्यात या दुकानदाराने गावातील स्मशानभूमित या शिधापत्रिका जाळल्या. गावातील काही सुज्ञ नागरिकांनी घटनास्थळावर पोलीस पाटील, सरपंच यांना घेऊन गेले. तेथे पंचनामा करण्यात आला. अर्धवट जळलेल्या शिधापत्रिका ताब्यात घेण्यात आल्या. याप्रकरणी महागाव तहसीलला सूचना देण्यात आली. परंतु त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर बिरसा मुंडा ब्रिगेडने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे.