शेकडो शेतकऱ्यांचे बँक खातेच नाही
By Admin | Updated: January 17, 2015 23:08 IST2015-01-17T23:08:18+5:302015-01-17T23:08:18+5:30
तालुक्यातील संपूर्ण गावांची निवड दुष्काळग्रस्त मदतीसाठी झाली आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांचे बँकेत खातेच नसल्याने पेच निर्माण झाला आहे.

शेकडो शेतकऱ्यांचे बँक खातेच नाही
मारेगाव : तालुक्यातील संपूर्ण गावांची निवड दुष्काळग्रस्त मदतीसाठी झाली आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांचे बँकेत खातेच नसल्याने पेच निर्माण झाला आहे.
तालुक्यातील विविध गावांतील पात्र शेतकऱ्यांना शासकीय अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना बँक खाते क्रमांक प्राप्त करून देण्याची मोहीम तलाठ्यांमार्फत सुरू करण्यात आली आहे. शासकीय आर्थिक मदतीचा लाभ मिळावा, या हेतूने ज्या शेतकरी खातेदारांनी अद्याप त्यांचे अद्ययावत बँक खाते क्रमांक तलाठ्यांना दिले नाहीत, त्यांनी पासबुकच्या झेरॉक्ससह क्रमांक संबंधित तलाठ्याकडे द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे बँक खाते क्रमांक नाहीत, त्यांनी तत्काळ प्रधानमंत्री जन-धन योजनेंतर्गत नजीकच्या बँकेत आपले नवीन खाते उघडून त्याचा क्रमांक पासबुुकच्या झेरॉक्ससह पटवाऱ्यांकडे द्यावा. शेतकऱ्यांच्या सोयीच्या दृष्टीने त्यांचे बँक खाते क्रमांक घेण्यासाठी येथील तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला आहे. सर्व शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार डॉ. संतोष यावलीकर यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)