सखी मंचच्या हळदी-कुंकू कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद

By Admin | Updated: February 14, 2016 02:19 IST2016-02-14T02:19:46+5:302016-02-14T02:19:46+5:30

लोकमत-समाचार-टाईम्स सखी मंचच्यावतीने आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद लाभला. येथील दर्डा मातोश्री सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला.

A huge response to the Sakhi platform's Haldi-Kuku program | सखी मंचच्या हळदी-कुंकू कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद

सखी मंचच्या हळदी-कुंकू कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद

विविध स्पर्धांमध्ये सहभाग : ‘प्रकृती जियो फ्रेश’चे सहकार्य
यवतमाळ : लोकमत-समाचार-टाईम्स सखी मंचच्यावतीने आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद लाभला. येथील दर्डा मातोश्री सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला. संपूर्ण सभागृह खचाखच भरून गेले होते. यानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यात सखींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
स्थानिक उमरसरा भागातील ‘प्रकृती जियो फ्रेश’ या औषधी उत्पादन कंपनीच्या सहकार्याने कार्यक्रम आणि स्पर्धा घेण्यात आल्या. चहा, साखर आणि बिस्कीटपासून रांगोळी काढण्याच्या स्पर्धेत प्रथम बक्षीस माला टाके यांनी प्राप्त केले. शुभांगी भालेराव या द्वितीय बक्षीसाच्या मानकरी ठरल्या, तर तृतीय बक्षीस दीपाली झोपाटे यांनी प्राप्त केले. या स्पर्धेच्या परीक्षक म्हणून पुष्पा पालडीवाल आणि
निशा बाजोरिया यांनी काम पाहिले. रेखा गांधी व शैलजा दरक यांनी परीक्षकांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
तीळापासून टिकली सजाओ स्पर्धेत सुरेख टिकल्या तयार केल्या होत्या. या स्पर्धेच्या प्रथम पुरस्काराच्या मानकरी दीपा तम्मेवार ठरल्या. द्वितीय पुरस्कार अंजली येरावार यांना प्राप्त झाला. तृतीय पुरस्कार शुभांगी भालेराव आणि अरुणा चांडक यांना विभागून देण्यात आला. या स्पर्धेच्या परीक्षक म्हणून निलू बाजोरिया व शोभा गट्टाणी यांनी काम पाहिले. वनीता तम्मेवार व प्राप्ती गांधी यांनी परीक्षकांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
या कार्यक्रमात शुभदा हातगावकर, स्मिता गंधे, भाग्यश्री गटलेवार, श्रद्धा तोडसाम, वंदना तोडसाम, पद्मा मुटकुळे, स्वप्नाली चौधरी, शलाका चौधरी, सुवर्णा राऊत यांनी सादर केलेल्या नृत्याने कार्यक्रमात रंगत भरली. शुभदा हातगावकर, स्मिता गंधे यांनी कार्यक्रमस्थळी साकारलेली रांगोळी लक्षवेधून घेत होती.
स्पर्धेचे बक्षीस वितरण लोकमत सखी मंचच्या जिल्हा प्रमुख सीमा दर्डा यांच्या हस्ते झाले. ‘प्रकृती जियो फ्रेश’चे संचालन शिवदास गुल्हाने अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सोनाली राऊत आदी उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. स्पर्धा आणि कार्यक्रमासाठी छाया राठोड, अलका राऊत, विद्या बेहरे, नीलिमा मंत्री, सुनीता भोयर, सुरूची खरे, अपर्णा परसोडकर, शिल्पा नथवाणी आदींचे सहकार्य लाभले. (उपक्रम प्रतिनिधी)

Web Title: A huge response to the Sakhi platform's Haldi-Kuku program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.