महिला ‘रॉक शो’ला उदंड प्रतिसाद
By Admin | Updated: October 24, 2015 02:26 IST2015-10-24T02:26:46+5:302015-10-24T02:26:46+5:30
येथील समता मैदानात यवतमाळ फेस्टिव्हल-२०१५ अंतर्गत आयोजित महिला ‘रॉक शो’ला उदंड प्रतिसाद लाभला. उर्मीला धनगर यांनी सादर केलेल्या गायकीला रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

महिला ‘रॉक शो’ला उदंड प्रतिसाद
यवतमाळ फेस्टिव्हल : युगुल गीते, लावण्यांसह विविध गीतांनी रंगत वाढली
यवतमाळ : येथील समता मैदानात यवतमाळ फेस्टिव्हल-२०१५ अंतर्गत आयोजित महिला ‘रॉक शो’ला उदंड प्रतिसाद लाभला. उर्मीला धनगर यांनी सादर केलेल्या गायकीला रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
मुंबई महिला बँडने रॉक शो सादर करताना एकाहून एक सरस गीते सादर केली. ‘लंबी जुदाई’, ‘तुझ्या उसाला लागल कोल्हा’ आदी गीते उर्मीला धनगर व मुंबई महिला बँडने सादर केली. स्नेहा कुलकर्णी यांनी मोहम्मद रफी यांच्या आवाजातील सुपर हिट गीते सादर केली. त्यांच्यासोबत गायिका मानसी जोशी, पौर्णिमा परिघर यांनी युगल गीते सादर केली.
ढोलकी आणि ढोल प्रेशिता मोरे, काँगो ढोलक - निशा मोकल, पॅड आॅक्टोपॅड - प्रगती तांबे, ड्रम - भक्ती कापडिया, की-बोर्ड - उमा देवराज, प्रतीक्षा चिंदरकर यांनी साथसंगत केली. बीआरडी फिल्म मुंबईच्या डॉ. भावना डाबरे यांच्या हस्ते या कलावंतांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी समता पर्वातील यवतमाळ आयडॉल ठरलेल्या उज्ज्वल गजभार व अन्य तिघांनी महात्मा जोतिबा फुले यांच्यावर सुंदर रचना सादर केली. सपना इंगोले, नीलम इंगोले यांनी गीते सादर केली.
अंकुश वाकडे यांनी भूमिका विशद करताना कलावंतांचा परिचय करून दिला. संचालन जयश्री पाटील यांनी, तर आभार यवतमाळ फेस्टिवल-२०१५ संयोजन समितीच्या अध्यक्ष सुनीता काळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी समितीच्या सचिव राखी भगत, मंगला दिघाडे, प्रा.डॉ. छाया महाले, माया गोबरे, प्रा.डॉ. सुनंदा वालदे, रविता भोवते, जयश्री भगत, अर्चना खरतडे, उज्ज्वला इंगोले, कमलाताई खंडारे, सिंधुताई धवने, चारूलता पावसेकर, प्रज्ञा फुलझेले, कुंदा तोडकर, माधुरी आडे, जयश्री पाटील, माधुरी कांबळे, एकता वाणी आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)