आमदारांच्या घराला ‘स्वामिनीं’चा घेराव

By Admin | Updated: April 30, 2016 02:37 IST2016-04-30T02:37:42+5:302016-04-30T02:37:42+5:30

येथील भाजपा आमदार राजू तोडसाम यांच्या निवासस्थानाला ‘स्वामिनीं’च्या शेकडो महिलांनी जिल्हा दारूबंदीच्या मागणीसाठी शुक्रवारी घेराव घातला.

The house of the legislators' gherao of 'Swaminar' | आमदारांच्या घराला ‘स्वामिनीं’चा घेराव

आमदारांच्या घराला ‘स्वामिनीं’चा घेराव

पांढरकवडा येथे ठिय्या : दारूबंदीसाठी दिले सौभाग्यवतींना निवेदन, जिल्ह्यात दारूबंदीची मागणी रेटली
पांढरकवडा : येथील भाजपा आमदार राजू तोडसाम यांच्या निवासस्थानाला ‘स्वामिनीं’च्या शेकडो महिलांनी जिल्हा दारूबंदीच्या मागणीसाठी शुक्रवारी घेराव घातला. महिलांनी दारूबंदीचे निवेदन आमदारांच्या सौभाग्यवतींना सादर केले.
स्वामिनी जिल्हा दारूबंदी अभियानाचे संयोजक महेश पवार यांच्या नेतृत्वात परिसरातील शेकडो महिला शुक्रवारी एकत्रित झाल्या. त्यांनी थेट आमदार राजू तोडसाम यांचे निवासस्थान गाठून त्यांच्या निवासस्थानाला अचानक घेराव घातला. यावेळी आमदार तोडसाम यांनी दिलेल्या जिल्हा दारूबंदीचे आश्वासन पूर्ण करा व जिल्हा दारूमुक्त करा, अशी मागणी महिलांनी लावून धरली होती. यावेळी आमदार तोडसाम हे घरी नव्हते. महिलांचा आक्रोश मात्र सुरूच होता. त्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. जिल्हा दारूमुक्त झालाच पाहिजे, असा घोषा महिलांनी लावला होता.
आमदार घरी नसल्याने अखेर त्यांच्या सौभाग्यवती अर्चना तोडसाम यांनी महिलांसोबत चर्चा केली. त्यांनी यवतमाळ जिल्हा दारूबंदीचे निवेदन स्विकारले. तसेच आमदार तोडसाम यांच्याकडे निवेदन पोहोचवून दारूबंदीसाठी मुख्यमंत्र्यांसोबत शिष्टमंडळाची भेट घडवून आणू, असे आश्वासन अर्चना तोडसाम यांनी दिले. गेल्यावर्षी घाटंजी येथील महिलांच्या दारूबंदी मोर्चाला सामोरे जाताना आमदार तोडसाम यांनी दारूबंदीचे आश्वास दिले होते. मात्र आजपर्यंत त्यांनी एकदाही विधानसभेत याबाबत प्रश्न उपस्थित केला नाही, असा आरोप महिलांनी केला. लोकप्रतिनिधी जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी दारूबंदीला समर्थन जाहीर केले आहे. मात्र अद्याप जिल्ह्यात दारूबंदी झाली नाही. ही जनतेची दिशाभूल असल्याचा आरोप आरोप स्वामिनी जिल्हा दारूबंदी अभियानाचे संयोजक महेश पवार यांनी यावेळी केला. यावेळी वणीचे राजू निमसटकर, दिलीप भोयर, वनिता खडसे, भावना नव्हाते, चौधरी, रिना घावडे, अरविंद खडसे, अजय आरेवार, बालाजी कदम, रितेश बोबडे, पार्वता भांडारवार, फरजाना शेख, भगवान चिखलकर, रेखा मडावी, गोपिका चिकराम, सुनिता भालेराव, विठाबाई संगमवार यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The house of the legislators' gherao of 'Swaminar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.