मोक्काच्या ११ आरोपींची घरझडती
By Admin | Updated: November 22, 2014 23:08 IST2014-11-22T23:08:55+5:302014-11-22T23:08:55+5:30
गंभीर गुन्हे शिरावर असलेल्या येथील गुन्हेगारी वर्तुळातील १४ सक्रीय सदस्यांवर ‘मोक्का’ची (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) कारवाई करण्यात आली. २४ नोव्हेंबरपर्यंत त्यातील ११ आरोपी

मोक्काच्या ११ आरोपींची घरझडती
यवतमाळ : गंभीर गुन्हे शिरावर असलेल्या येथील गुन्हेगारी वर्तुळातील १४ सक्रीय सदस्यांवर ‘मोक्का’ची (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) कारवाई करण्यात आली. २४ नोव्हेंबरपर्यंत त्यातील ११ आरोपी पोलीस कोठडी आहेत. यादरम्यान पोलिसांनी संबंधित आरोपींच्या घराची झडती घेतली.
अशोक नारायण येसने, नीलेश भानुदास कोयरे, सागर नारायण भुते, आकाश अरूण धनाडे, बजरंग भीमराव सोळंके, आनंद उर्फ गोलु शंकर पारधी, सतीश चंद्रशेखर चौधरी, तुलसी रामाजी बघमारे, आरीफ शाह शफीक शाह, मनीष रामदुलारी यादव, अक्षय अनिल गुंजाळ अशी घरझडती झालेल्या मोक्कातील आरोपींची नावेत आहेत. शहराच्या गुन्हेगारी वर्तुळात सक्रीय असलेल्या या टोळी सदस्यांच्या शिरावर अपहरण, खून, खंडणी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. अमरावती परीक्षेत्राचे तत्कालिन विशेष पोलीस महानिरीक्षक बिपिन बिहारी यांच्या आदेशाने १४ जणांच्या मोक्काचा प्रस्ताव तयार करण्यात आला. आता पोलीस एक-एक पुरावा गोळा करीत आहे. एसडीपीओ भालचंद्र महाजन हे या प्रकरणाचे तपास अधिकारी असून, त्यांच्या नेतृत्वातील पथकाने या ११ ही आरोपींच्या घराची झडती घेतली. मात्र झडतीत काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याचे सांगण्यात आले.
२४ नोव्हेंबरला या आरोपींची पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना अमरावती येथील विशेष मोक्का न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यांच्या कोठडी वाढ व्हावी म्हणून पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहे. त्याचबरोबर पुरावेही गोळा करण्यात येत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)