गुंड प्रवृत्तीच्या पोलिसांना त्वरित बडतर्फ करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:31 IST2021-06-01T04:31:40+5:302021-06-01T04:31:40+5:30

पोलीस अधीक्षक, जुन्या जालना पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी शिवराज नारियलवाले यांच्यासोबत अमानुष वर्तन केले. जनावरांपेक्षाही जीवघेणी मारहाण केली. ...

Hooliganism should be stopped immediately | गुंड प्रवृत्तीच्या पोलिसांना त्वरित बडतर्फ करावे

गुंड प्रवृत्तीच्या पोलिसांना त्वरित बडतर्फ करावे

पोलीस अधीक्षक, जुन्या जालना पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी शिवराज नारियलवाले यांच्यासोबत अमानुष वर्तन केले. जनावरांपेक्षाही जीवघेणी मारहाण केली. ही घटना अत्यंत दुःखदायक आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाला. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व गवळी समाज बांधव संतापले आहे.

महाराष्ट्र पुरोगामी विचारांचे राज्य असून ही घटना मानवतेला व महाराष्ट्र पोलीस खात्याला काळिमा फासणारी आहे. त्यामुळे राज्याची प्रतिमा मलिन झाली आहे. संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरूध्द त्वरित गुन्हे नोंदवून त्यांना बडतर्फ करावे, अन्यथा गवळी समाज संघटनेतर्फे संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र गवळी समाज संघटनेने दिला आहे. मागणीचे निवेदन तालुकाध्यक्ष शरद कुबडे, उपाध्यक्ष साहेबराव साखरे, सचिव गजानन मंदाडे, सीताराम भाकरे, अनिल साखरे, विनू पुलाते, नारायण पुलाते, अरुण पुलाते, गजानन हिंगमिरे, सुनील पुलाते, शंकर माटे आदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.

Web Title: Hooliganism should be stopped immediately