पुसद येथे परिचारिकांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:46 IST2021-05-25T04:46:49+5:302021-05-25T04:46:49+5:30

पुसद : कोरोना काळात पॉझिटिव्ह रुग्णांची सेवा करून त्यांचे जीवन वाचविण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या परिचारिकांचा येथे कोरोना फ्रंटलाईनर म्हणून ...

Honoring the nurses at Pusad | पुसद येथे परिचारिकांचा सन्मान

पुसद येथे परिचारिकांचा सन्मान

पुसद : कोरोना काळात पॉझिटिव्ह रुग्णांची सेवा करून त्यांचे जीवन वाचविण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या परिचारिकांचा येथे कोरोना फ्रंटलाईनर म्हणून साडी देऊन सन्मान करण्यात आला.

नगरसेवक साकिब शाह यांनी उपजिल्हा रुग्णालयासह शहरातील खासगी कोविड सेंटरमधील परिचारिकांचा बिरसा मुंडा ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष मारोती भस्मे, भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे, दिलीप खैरे, सामाजिक कार्यकर्ते आलोक अग्रहरी, विनोद राठोड, प्रवेश टाकरस यांच्या हस्ते साडी, चोळी देऊन सन्मान केला. यावेळी परिचारिकांनी आम्ही केवळ कर्तव्य समजून कोरोना रुग्णांची सेवा करीत असल्याचे सांगितले. मात्र, आजपर्यंत कोणी पाठ थोपटली नाही. या सन्मानाने आमच्यावरील जबाबदारी वाढल्याचे स्पष्ट केले. कोरोनामध्ये काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम ठरला. हा उपक्रम राबविल्याबद्दल नगरसेवक साकिब शाह यांचे कौतुक होत आहे.

Web Title: Honoring the nurses at Pusad