मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी सन्मानित

By Admin | Updated: April 26, 2017 00:12 IST2017-04-26T00:12:18+5:302017-04-26T00:12:18+5:30

जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांना नागरी सेवा दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे ...

Honored District Collector at the hands of Chief Minister | मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी सन्मानित

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी सन्मानित

सचिंद्र प्रताप सिंह : उत्कृष्ट कार्याची दखल
यवतमाळ : जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांना नागरी सेवा दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्काराने गौरविण्यात आले. गेली दोन वर्षात केलेल्या लोकाभिमुख कामांची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव भगवान सहाय आदी उपस्थित होते.
नागरी सेवा दिनी दरवर्षी राज्य शासनाच्यावतीने उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार देऊन गौरविले जाते. सचिंद्र प्रताप सिंह यांनी मे २०१५ मध्ये जिल्हाधिकारी पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर प्रशासनात शिस्त आणण्यासोबतच जिल्हा यंत्रणा प्रचंड गतिमान केली. सामान्य नागरिकांची कामे कुठेही अडणार नाही, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या कार्यकाळात मागील दोन वर्षात आतापर्यंतचे सर्वाधिक पिककर्ज वाटप झाले. जिल्ह्याचे रबी क्षेत्र दुप्पट झाले. शेतकरी आत्महत्यामध्ये जवळजवळ चाळीस टक्के घट झाली. ई-डिस्ट्रीक्ट योजनेंतर्गत जिल्हा राज्यात सर्वाधिक आॅनलाईन प्रमाणपत्र वितरण करणारा जिल्हा ठरला. जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविले. रेल्वे भूसंपादनाची कार्यवाही गतिमान झाली. बोरी-तुळजापूर महामार्ग बांधकामाच्या निविदाही जिल्हा प्रशासनाच्या जलद भूसंपादनाने प्रसिध्द झाल्या. या विविध कामांची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. (वार्ताहर)

Web Title: Honored District Collector at the hands of Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.