सुधाकरराव नाईक यांना आदरांजली

By Admin | Updated: May 11, 2015 01:54 IST2015-05-11T01:54:58+5:302015-05-11T01:54:58+5:30

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा जलसंधारणाचे प्रणेते सुधाकरराव नाईक यांच्या...

Honor to Sudhakarrao Naik | सुधाकरराव नाईक यांना आदरांजली

सुधाकरराव नाईक यांना आदरांजली

पुसद : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा जलसंधारणाचे प्रणेते सुधाकरराव नाईक यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त गहुली येथे भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.
पुसद तालुक्यातील गहुली येथे दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या समाधीस्थळी सकाळी ८ वाजता आपल्या नेत्याला भावांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने चाहतावर्ग उपस्थित होता. सर्वप्रथम माजी मंत्री आमदार मनोहरराव नाईक, पणन महासंघाचे अध्यक्ष डॉ.एन.पी. हिराणी, माजी आमदार विजय पाटील चोंढीकर यांनी पुष्प अर्पण करून आदरांजली अर्पित केली. त्यानंतर प्रा.चंद्रकिरण घाटे, प्रा.साधना मोहोड यांनी रामधून व भजने सादर केली.
कार्यक्रमाला आर.डी. राठोड, जिल्हा परिषद सदस्य ययाती नाईक, अ‍ॅड. निलय नाईक, प्रा.आप्पाराव चिरडे, प्रा.गोविंदराव फुके, पंचायत समिती सभापती सुभाष कांबळे, प्राचार्य डॉ.के.रवी, प्राचार्य डॉ.टी.एन. बूब, प्राचार्य डॉ.संजीव मोटके, प्राचार्य रवी वानरे, अण्णा ठेंगे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Honor to Sudhakarrao Naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.