जिल्हा परिषदेच्यावतीने कर्तबगार शेतकऱ्यांचा सन्मान
By Admin | Updated: July 2, 2016 02:45 IST2016-07-02T02:45:31+5:302016-07-02T02:45:31+5:30
हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनानिमित्त आयोजित कृषी दिन कार्यक्रमात यवतमाळ ...

जिल्हा परिषदेच्यावतीने कर्तबगार शेतकऱ्यांचा सन्मान
कृषी दिन : शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन, जिल्हाभरातील ३३ प्रयोगशील शेतकऱ्यांच्या परिश्रमाला सलाम
यवतमाळ : हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनानिमित्त आयोजित कृषी दिन कार्यक्रमात यवतमाळ जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यातील ३३ प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान केला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे होत्या.
येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात शुक्रवारी आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, अर्थ व बांधकाम सभापती सुभाष ठोकळ, शिक्षण व आरोग्य सभापती नरेंद्र ठाकरे, समाज कल्याण सभापती लता खांदवे, महिला बालकल्याण सभापती विमल चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुळकर्णी, कृषी विकास अधिकारी जगन राठोड यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
या कार्यक्रमात पंजाबराव देशमुख कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ पाटील यांनी सोयाबीनवरील कीड नियंत्रणाच्या प्रयोगाची तांत्रिक माहिती दिली. उपक्रमशील शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. जिल्हाभरातून ३३ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतीचे नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांनाही गौरविण्यात आले. यामध्ये यवतमाळ तालुक्यातील सुभाष भाऊरावजी सरोदे (भारी), संगीता धनराज चिकटे (पिंपरी बु), बाभूळगाव तालुक्यातील नीलेश सोपानराव धवणे (वडगाव), वच्छलाबाई महादेवराव गर्जे (मादनी), राळेगाव तालुक्यातील विलास दादाराव संगेवार (झाडगाव), विकास महिपत भगत (अंतरगाव), घाटंजी तालुक्यातील विजय बापूरावजी परचाके (दहेगाव), सुरेश मोतीराम ठाकरे (इंजाळा), पांढरकवडा तालुक्यातील गजानन तोटावर (खैरगाव), शोभा टेकाम (वांजरी), वणी तालुक्यातील अविनाश पावडे (नवरगाव), सुनीता डाहुले (शिरपूर), मारेगाव तालुक्यातील हनुमान खोके (बोंडबुरांडा), सुनीता हरबडे (बोदाड), झरी जामणी तालुक्यातील सीताराम पिंगे (अडेगाव), बेबीताई चामाटे (मांगली), नेर तालुक्यातील प्रशांत मासाळ (कोलुरा), कांता सुने (नेर), आर्णी तालुक्यातील अतुल देशमुख (परसोडा), संदीप उपाध्ये (माहळुंगी), कळंब तालुक्यातील संजय दरणे (हिवरा दरणे), वर्षाताई हाडके (आष्टी), दारव्हा तालुक्यातील आशिष राऊत (वरुड), आनंद मानकर (पिंपरी बु.), दिग्रस तालुक्यातील रतनलाल जयस्वाल (साखरा), वृषाली दुधे (हरसूल), पुसद तालुक्यातील माधव शिंदे (वरुड), संजय बळी (गाजीपूर), उमरखेड तालुक्यातील नारायण दुद्दलवार (ढाणकी), वसंतराव चव्हाण (तरोडा), महागाव तालुक्यातील गणेश चेलमेलवार (सवना), संध्या पोराजवार (बोरी इजारा), राजेंद्र राठोड (मनोहरनगर) या शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे आणि उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांनी आपल्या भाषणातून जिल्हा परिषदेच्या कृषी विषयक योजनांची माहिती दिली. संकटाच्या काळात शासनाकडून कुठल्या स्वरूपात मदत मिळावी याबाबतही उल्लेख केला. (कार्यालय प्रतिनिधी)
वसंतराव नाईक यांना अभिवादन
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस दरवर्षी कृषीदिन म्हणून साजरा केला जाता. जिल्ह्यात ठिकठिकाणी वसंतराव नाईक यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या आवारात वसंतराव नाईक यांच्या पुतळ््याला अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पालकमंत्री संजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, मुख्य वनसंरक्षक वसंत गुरमे, जिल्हा परिषदेचे सभापती सुभाष ठोकळ, उपवनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुळकर्णी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरेश शहापुरकर, प्राचार्य शंकरराव सांगळे, डॉ. टी.सी. राठोड उपस्थित होते.