व्यावसायिकाचा प्रामाणिकपणा

By Admin | Updated: May 10, 2014 00:57 IST2014-05-10T00:57:59+5:302014-05-10T00:57:59+5:30

येथील साई मंदिर चौकातील एका झेरॉक्स दुकानादाराने प्रामाणिकपणा अद्यापही जिवंत असल्याचे पटवून दिले. सदर झेरॉक्स दुकानात झेरॉक्स काढण्यासाठी ..

The honestness of the businessman | व्यावसायिकाचा प्रामाणिकपणा

व्यावसायिकाचा प्रामाणिकपणा

वणी : येथील साई मंदिर चौकातील एका झेरॉक्स दुकानादाराने प्रामाणिकपणा अद्यापही जिवंत असल्याचे पटवून दिले.
सदर झेरॉक्स दुकानात झेरॉक्स काढण्यासाठी राजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चिखलगाव उपकेंद्रात कार्यरत परिचारीका ललिता चंदू वेट्टी आल्या होत्या. झेरॉक्स काढल्यानंतर त्या परत गेल्या. मात्र आपली पर्स त्या दुकानातच विसरल्या. त्यात पाच हजार ८0३ रूपये होते. शुक्रवारी सकाळी १0 वाजता ही घटना घडली. शरद ढुमणे, असे प्रामाणिक दुकानदाराचे नाव आहे. शरद ढुमणे यांनी चौकशी करून त्या परिचारिकेला पर्स घेऊन जाण्यासाठी बोलाविले. त्यांना ती पर्स परत केली. शरद ढुमणे यांनी अजूनही प्रामाणिकपणा जीवंत असल्याचे दर्शवून दिले आहे.
ही रक्कम घेऊन ललिता वेट्टी लगतच्या वांजरी येथे जात होत्या. ही रक्कम आशा स्वयंसेविकांच्या मानधनाची होती. मात्र पर्स गहाळ झाल्याने वांजरी येथे पोहोचल्यानंतर त्यांची घाबरगुंडी उडाली होती. मात्र पर्स परत मिळाल्याने त्यांनी सुटकेचा निश्‍वास सोडून शरद यांचे आभार मानले. ढुमणे यांचे प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: The honestness of the businessman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.