ढाणकी येथे होमगार्डची, करंजी येथे युवतीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:28 IST2021-07-02T04:28:24+5:302021-07-02T04:28:24+5:30

ढाणकी : येथील होमगार्डने राहत्या रूमवर, तर करंजी येथील एका युवतीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. होमगार्डने बुधवारी ...

Homeguard commits suicide at Dhanki, young woman commits suicide at Karanji | ढाणकी येथे होमगार्डची, करंजी येथे युवतीची आत्महत्या

ढाणकी येथे होमगार्डची, करंजी येथे युवतीची आत्महत्या

ढाणकी : येथील होमगार्डने राहत्या रूमवर, तर करंजी येथील एका युवतीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. होमगार्डने बुधवारी रात्री ८ वाजता, तर युवतीने गुरुवारी दुपारी आत्महत्या केली.

शुभम बाबू चप्पलवाड (वय २५, रा. राहूर) असे मृत होमगार्डचे नाव आहे. शुभम गेल्या दोन वर्षांपासून बिटरगाव पोलीस ठाण्यात होमगार्ड म्हणून कार्यरत होता. बुधवारी रात्री त्याची नाईट ड्युटी होती. मात्र, १० वाजले तरी तो ड्युटीवर न आल्याने त्याचा मित्र रूमवर पाहण्यासाठी गेला. त्यावेळी शुभम लटकलेला आढळला. शुभमने असे टोकाचे पाऊल का उचलले, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दुसऱ्या घटनेत गुरुवारी दुपारी करंजी येथील एका युवतीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना दुपारी २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. प्रणिता माणिकवाड (२०) असे मृत युवतीचे नाव आहे. तिने गुरुवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेतला. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण कळले नाही. पुढील तपास बिटरगाव पोलीस करीत आहेत.

Web Title: Homeguard commits suicide at Dhanki, young woman commits suicide at Karanji