पवित्र रमजान पर्वात फुलली बाजारपेठ

By Admin | Updated: June 16, 2017 01:43 IST2017-06-16T01:43:55+5:302017-06-16T01:43:55+5:30

पवित्र रमजान महिन्याला प्रारंभ झाला असून यानिमित्त यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या बाजारपेठ फुलल्या आहे.

Holy Ramadan Pahul Fully Market | पवित्र रमजान पर्वात फुलली बाजारपेठ

पवित्र रमजान पर्वात फुलली बाजारपेठ

यवतमाळ : पवित्र रमजान महिन्याला प्रारंभ झाला असून यानिमित्त यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या बाजारपेठ फुलल्या आहे. विविध साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होते. यवतमाळच्या कळंब चौकात करण्यात आलेली रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
रमजान हा संपूर्ण महिना पुण्याई आणि भरभराटीचा असतो. या महिन्यात रोजा करून अल्लाहाची आराधना केली जाते. या महिन्यात लैल तुलकद्र ही सौभाग्याची रात्र येते. रमजान महिन्याच्या शेवटच्या दहा दिवसात विषम संख्येच्या रात्री २१, २३, २५, २७ व २९ यापैकी एक रात्र असते. या रात्रीची तारीख निश्चितपणे न सांगण्यामागे उद्देश हाच की श्रद्धावंतांनी पाचही रात्री उपासना करावी. या रात्रीत अल्लाहकडून संपूर्ण मानव जातीसाठी दिव्य कुरआनचे अवतरण झाले. त्यामुळे रमजान महिन्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. या निमित्त शहरासह ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम आणि प्रबोधनपर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. यवतमाळ शहरातील कळंब चौक परिसरात पवित्र रमजान महिन्यानिमित्त बाजारपेठ सजली आहे. विविध खाद्यपदार्थ आणि साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहे. येथे रात्री खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी असते. सुखामेवा, फळ, अत्तर, नमाजकरिता लागणाऱ्या टोप्या, फेण्या, कपडे येथे उपलब्ध आहे. विशेष म्हणजे बाहेरगावाहून येणारे प्रवासी, विद्यार्थी, व्यापारी आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी सहेरीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सहेरी कमेटीने पुढाकार घेतला आहे. लोकसहभागातून दररोज ६०० ते ७०० नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येते.

लखनौचे कारागिर
यवतमाळच्या बाजारात विविध खाद्यपदार्थ तयार करून विकले जातात. त्यासाठी खास लखनौवरून फेणी तयार करणारे कारागिर आले आहे. या ठिकाणी फेण्यांचे विविध प्रकार दिसून येतात. ८० ते १०० रुपये किलोपर्यंत फेणी बाजारात उपलब्ध आहे.

Web Title: Holy Ramadan Pahul Fully Market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.