शासन अध्यादेशाची होळी
By Admin | Updated: April 7, 2016 02:30 IST2016-04-07T02:30:28+5:302016-04-07T02:30:28+5:30
काम नाही, तर वेतन नाही, असा शासन निर्णयच निर्गमित करण्यात आला आहे.

शासन अध्यादेशाची होळी
आश्रमशाळा शिक्षकांची उपासमार : सहायक आयुक्तांपुढे निषेध
यवतमाळ : काम नाही, तर वेतन नाही, असा शासन निर्णयच निर्गमित करण्यात आला आहे. यामुळे ज्या आश्रमशाळा बंद होणार आहेत अशा शिक्षकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. या निर्णयाविरोधात महाराष्ट्र आश्रम शाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघाच्या कर्मचाऱ्यांनी आवाज उठविला आणि शासनाच्या अध्यादेशाची बुधवारी होळी केली.
काम नाही तर वेतन नाही हा शासकीय अध्यादेश रद्द करण्यात यावा, आश्रम शाळा संहिता लागू करण्यात यावी, उच्च माध्यमिक आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे वेतन चालू करण्यात यावे, अंशदायी निवृत्ती वेतन योजना बंद करण्यात यावी, सुवर्णमहोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजना आश्रमशाळेतील अनिवासी विद्यार्थ्यांना लागू करण्यात यावी यांसह विविध मागण्यांचे निवेदन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय साळवे यांना सादर केले.
कार्यालयाच्या बाहेर १ एप्रिल २०१६ च्या शासकीय अध्यादेशाची होळी करण्यात आली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंकज चक्करवार, शरद जाधव, भुपाल राठोड, जिल्हा सरचिटणीस प्रमोद मुनेश्वर, विजय राठोड, संजय धांडे, प्रकाश गोंडाणे, सुभाष कुंबलवाड, उत्तम राठोड, धनेश्वर घुगरे, दीपक गिऱ्हे, संतोष आंबेपवार, एम.बी.अढाऊ, जितेन्द्र गाडगे, नंदकिशोर पाटील, तुळशीराम जाधव, आर.वाय. शेख, अविनाश आडे, पी.व्ही. वाघ, जयदीप पवार, फत्तेचंद चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)