एचआयव्ही एड्स मार्गदर्शन कार्यशाळा
By Admin | Updated: October 20, 2015 03:05 IST2015-10-20T03:05:01+5:302015-10-20T03:05:01+5:30
जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथक यवतमाळच्या संयुक्त

एचआयव्ही एड्स मार्गदर्शन कार्यशाळा
पुसद : जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथक यवतमाळच्या संयुक्त विद्यमाने तसेच पुसद उपजिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने पुसद येथील तीनही पोलीस ठाण्यात एचआयव्ही एड्स मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत एचआयव्हीबाबत असलेले समज-गैरसमज आदींबाबत मार्गदर्शन डॉ. मनीष देशमुख यांनी केले. ते म्हणाले, एचआयव्ही होण्याचे प्रमुख चार कारणे आहे. असुरक्षित संबंध, संक्रमित गरोदर मातेकडून, संक्रमित दूषित रक्त पुरवठा आणि संक्रमित दूषित सुईमुळे एचआयव्ही होतो. एचआयव्ही हा रक्ताची तपासणी करूनच माहीत होतो. या आजाराबाबत अनेक गैरसमज निर्माण झाले आहे. ते गैरसमज दूर करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. एड्सवर प्रतिबंध हाच उपाय असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाला ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पठाण, शहरचे ठाणेदार धनंजय जगदाळे, वसंतनगरचे ठाणेदार सदानंद मानकर होते. यशस्वीतेसाठी एकात्मिक सल्ला व समुपदेशन केंद्र उपजिल्हा रुग्णालय, एआरटी सेंटर येथील कर्मचारी सुजिता राजेश, संगीता गजभिये, राहुल गायकवाड यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला पंडित धुळध्वज, हिंमत राठोड, सुधरमा बावणे, राजश्री शिंदे, बिपीन पवार, द्रौपदी टारफे, श्रीकांत राठोड, राहुल गायकवाड आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)