‘त्यांच्या’ वीज बिलाने मारली ३०० रुपयांवरून १ लाख २८ हजारांवर उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 17:47 IST2019-08-18T17:45:09+5:302019-08-18T17:47:04+5:30
मुकूटबन येथून जवळच असलेल्या गणेशपूर येथील एका वृद्ध दांपत्याला तब्बल १ लाख २८ हजारांचे वीज बिल आले आहे.

‘त्यांच्या’ वीज बिलाने मारली ३०० रुपयांवरून १ लाख २८ हजारांवर उडी
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: महावितरणने अवाजवी वीज बिल पाठवल्याच्या अनेक घटनांमध्ये अजून एक घटना सामील झाली आहे. मुकूटबन येथून जवळच असलेल्या गणेशपूर येथील एका वृद्ध दांपत्याला तब्बल १ लाख २८ हजारांचे वीज बिल आले आहे.
मोल मजुरी करून गुजराण करीत असलेले हे वृद्ध कुटुंब एका चंद्रमोळी झोपडीवजा घरात राहते. त्यांच्याकडे इनमीन तीन बल्ब व एक टेबलफॅन एवढीच विद्युत उपकरणे आहेत. ज्यांचं बिल आजवर ३०० ते ३५० रुपयांच्या दरम्यान येत होतं. नानाजी साधू निखाडे (६५) असे या गृहस्थांचे नाव आहे. त्यांना आॅगस्ट महिन्यात आलेलं हे बिल पाहून त्यांचे डोळेच पांढरे व्हायचे बाकी राहिले आहेत. एवढे बिल कुठून भरायचे असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.