स्वातंत्र्यदिनासाठी जिल्ह्यात हायअलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 10:17 PM2019-08-10T22:17:28+5:302019-08-10T22:18:07+5:30

स्वातंत्र्यदिनी नियमित बंदोबस्त ठेवला जातो. परंतु यावेळी जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम रद्द करून विशेष दर्जा काढून घेतला गेल्याने समाजातील एका गटाच्या कट्टर पंथीयांमध्ये नाराजी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिन लक्षात घेऊन हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

HighAlert in the district for Independence Day | स्वातंत्र्यदिनासाठी जिल्ह्यात हायअलर्ट

स्वातंत्र्यदिनासाठी जिल्ह्यात हायअलर्ट

Next
ठळक मुद्दे३७० कलमाचे सावट । पोलीस कुमक वाढविणार

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्वातंत्र्यदिनी नियमित बंदोबस्त ठेवला जातो. परंतु यावेळी जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम रद्द करून विशेष दर्जा काढून घेतला गेल्याने समाजातील एका गटाच्या कट्टर पंथीयांमध्ये नाराजी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिन लक्षात घेऊन हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. या अनुषंगाने पोलिसांना अधिक खबरदारी घेण्याच्या सूचना आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. जिल्ह्यात काही पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील क्षेत्र संवेदनशील-अतिसंवेदनशील म्हणून नोंद आहे. या क्षेत्रांवर पोलिसांचा अधिक फोकस राहणार आहे. नियमित बंदोबस्तापेक्षा वेगळ्या पद्धतीने बंदोबस्ताची व्यूहरचना केली जाणार आहे. त्यासाठी अधिक मनुष्यबळ नेमले जाणार आहे. १५ आॅगस्टच्या निमित्ताने जम्मू-काश्मीरमधील फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर नेमकी काय खबरदारी बाळगायची, याच्या सूचना महासंचालक कार्यालयातर्फे देण्यात आल्या आहे.
आजच्या घडीला जिल्ह्यात अनुभवी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची वाणवा आहेत. अप्पर अधीक्षक थेट आयपीएस आहेत, पुसदलाही थेट आयपीएस देण्यात आले आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या यवतमाळला एसडीपीओ नाहीत. अनेक ठाणेदार नवीन आहेत. त्यातच आता पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची बदल्यांची आणखी एक यादी निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून निघणार असल्याने त्यात जिल्ह्यातील कुणाचा समावेश होतो का, याकडे नजरा लागल्या आहे. तसे झाल्यास आणखी अनुभवी ठाणेदार कमी होण्याची शक्यता आहे.

थेट आयपीएसची पुसदला प्रतीक्षा
पुसदला थेट आयपीएस अधिकाऱ्याची एसडीपीओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र ते २४ आॅगस्टच्या पासिंग परेडनंतर रुजू होणार आहे. त्यानंतर चारच दिवसात गणेशोत्सव आहे. त्यामुळे या नव्या आयपीएसला आपले कार्यक्षेत्र समजून घ्यायला, अभ्यास करायला पुरेसा वेळ मिळणार नाही. याबाबत प्रशासनात चिंता पाहायला मिळते.

काश्मिरींवर वॉच
जिल्ह्यात कुठे काश्मिरी युवक आहेत का याची माहिती पोलिसांनी जाणून घेतली. मात्र परीक्षा झाल्याने गावाकडे गेलेले हे युवक अद्याप परतले नसल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. काही महिन्यांपूर्वी यवतमाळात काश्मिरी युवकांना मारहाण झाली होती. त्यामुळे पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलीस खबरदारी घेत आहे.

Web Title: HighAlert in the district for Independence Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस