शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

इन्स्ट्राग्रामवरील तिचे स्टेटस ठरले अखेरचे; संशयातूनच आस्थाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 05:00 IST

आस्थाचे शुभम अशोक बकाल (रा. शिंदेनगर) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. ती सकाळी १०.३० च्या सुमारास लोहारा एमआयडीसी परिसरात शुभमसोबत आली. तेथे असतानाच तिने शुभम सोबतचा फोटो स्वत:च्या इन्स्ट्राग्राम स्टेटसवर अपलोड केला.  नंतर दोघात काय बिनसले याचा थांगपत्ता नाही. आरोपी शुभमने हत्या करण्यापूर्वीच मद्य प्राशन केले. घटनास्थळी दारूची रिकामे बॉटल आढळून आली. शुभमने दगडाने आस्थाच्या चेहऱ्यावर प्रहार केले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोहारा एमआयडीसीमध्ये प्रियकराने प्रेयसीचा दगडाने ठेचून खून केला. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. त्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. या घटनेतील आस्था शिष्यवृत्तीचा अर्ज भरायला जाते असे सांगून गुरुवारी सकाळी १० वाजता घराबाहेर पडली. तिने ओटीपीकरिता आईचा मोबाइलही स्वत:कडे मागून  घेतला. या घटनेनंतर मुलीच्या खुनाचे वृत्त तुंबडे कुटुंबीयांना कळताच कुणाचा विश्वास बसेना. आस्थाची आई तर जागेवरच कोसळली. काय कसे कुठे असे अनेक प्रश्न त्यांच्या डोक्यात घोंगावत होते. आस्था सुरेश तुंबडे (१८)  ही बी.कॉम. प्रथम वर्षाला बाबाजी दाते महाविद्यालयात शिकायला होती. आस्था होतकरू असल्याने गुरुमाऊली सोसायटी उमरसरातील  आपल्या घरीच लहान मुलांच्या शिकवणीसुद्धा घेत होती. आस्थाचा स्वभाव मोकळा व ती निडर म्हणून कुटुंबात ओळखली जात होती. बुधवारी आस्था कुटुंबीयांसह राळेगाव येथे गेली. रात्री परत आल्यानंतर तिने गुरुवारी शिष्यवृत्तीचा अर्ज भरण्यासाठी लागणारे कागदपत्र बॅगेत घेतले. जाताना आईला तिचा मोबाइल मागितला व स्वत:च्या स्कुटीने घराबाहेर पडली. मुलगी अर्ज भरायला गेली असाच कुटुंबीयांचा समज होता. मात्र दुपारी १.३० वाजताच्या सुमारास आस्थाच्या आईला तिच्या खुनाची माहिती देण्यात आली. याचा प्रचंड धक्का बसला. आस्थाचे शुभम अशोक बकाल (रा. शिंदेनगर) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. ती सकाळी १०.३० च्या सुमारास लोहारा एमआयडीसी परिसरात शुभमसोबत आली. तेथे असतानाच तिने शुभम सोबतचा फोटो स्वत:च्या इन्स्ट्राग्राम स्टेटसवर अपलोड केला.  नंतर दोघात काय बिनसले याचा थांगपत्ता नाही. आरोपी शुभमने हत्या करण्यापूर्वीच मद्य प्राशन केले. घटनास्थळी दारूची रिकामे बॉटल आढळून आली. शुभमने दगडाने आस्थाच्या चेहऱ्यावर प्रहार केले. तिचा जबडा पूर्णत: तुटला. दात तोंडाबाहेर पडले होते. नंतर शुभमने जवळ असलेल्या ब्लेडने हाताची नस कापली, स्वत:चा गळाही चिरला. मात्र यात शुभम जखमी झाला. त्याची जीवितहानी झाली नाही. परिसरातील नागरिकांच्या वेळीच नजरेत आल्याने शुभमला शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. 

तडफडत असताना गुन्ह्याची कबुली - आस्था व शुभमच्या प्रेमात संशयाचे भूत शिरले. यातूनच शुभमने स्वत:च्या प्रेयसीला सोबत आणून एकांतात तिचा घात केला. याची कबुली त्याने रस्त्यावर तडफडत असताना पोलिसांकडे दिल्याचे लोहारा ठाणेदार दीपमाला भेंडे यांनी माध्यमांना सांगितले. आस्थाचे दुसऱ्या कुणाशी संबंध असल्याचा संशय आल्याने शुभमने तिची दगडाने ठेचून हत्या केल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी ३०२, ३०९ भादंविनुसार गुन्हा नोंद केला आहे. 

काही तासातच झाली खुनाच्या घटनेची उकल - खुनाच्या घटनेची माहिती मिळताच लोहारा पाेलीस घटनास्थळी पोहोचले. उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांनी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक अमोल ढोकणे व त्यांच्या पथकाने या घटनेची काही तासातच उकल केली. सुरुवातीला प्रेमीयुगुलाला लुटण्याच्या उद्देशाने तर हल्ला झाला नाही ना असा अंदाज होता. मात्र नंतर घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुरावे तसेच जखमीने दिलेली कबुली यावरून प्रेमप्रकरणातूनच हे हत्याकांड घडल्याचे उघड झाले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस