परराज्यातील मजुरांना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 05:00 IST2020-05-08T05:00:00+5:302020-05-08T05:00:07+5:30

स्वगृही परतण्यासाठी मजुरांना आपले तंदुरूस्ती प्रमाणपत्र द्यावे लागते. यानंतर त्यांना ऑनलाईन पास मिळतो. त्यासाठी तास्न तास रांगेत उभे राहून क्रमांक लावावा लागतो. त्यातही तपासणी होणार किंवा नाही, याची शाश्वती नसते. त्यानंतरही पास मिळाला तरी आता पुढे प्रवास करायचा तर खिशात पैसे नाही. यामुळे परप्रांतीय मजूर पायदळ प्रवास करीत पुढे जात आहेत.

A helping hand to other state workers | परराज्यातील मजुरांना मदतीचा हात

परराज्यातील मजुरांना मदतीचा हात

ठळक मुद्देस्वयंसेवी संस्थांचा पुढाकार : प्रक्रियेकरिता केले सहकार्य

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वाहनाची परवानगी न मिळाल्याने अनेक परप्रांतीय मजूर पायदळ प्रवास करीत आपल्या गावाकडे निघाले. अशा काही मजुरांना बुधवारी स्वयंसेवी संस्थांनी मदतीचा हात दिला. त्यांना दोन घास जेवण दिले. यामुळे त्यांचा पुढील प्रवास सुकर होण्यास मदत झाली.
स्वगृही परतण्यासाठी मजुरांना आपले तंदुरूस्ती प्रमाणपत्र द्यावे लागते. यानंतर त्यांना ऑनलाईन पास मिळतो. त्यासाठी तास्न तास रांगेत उभे राहून क्रमांक लावावा लागतो. त्यातही तपासणी होणार किंवा नाही, याची शाश्वती नसते. त्यानंतरही पास मिळाला तरी आता पुढे प्रवास करायचा तर खिशात पैसे नाही. यामुळे परप्रांतीय मजूर पायदळ प्रवास करीत पुढे जात आहेत.
संकल्प फाउंडेशनच्या नारी रक्षा सेवा समितीने बुधवारी विविध संघटनांच्या माध्यमातून त्यांच्या भोजनाची आणि नाश्त्याची व्यवस्था केली. हे मजूर गत तीन दिवसांपासून नांदेड, तेलंगाणा येथून निघाले आहे. त्यांना उत्तरप्रदेश आणि छत्तीसगडकडे प्रवास करायचा आहे. वाहतुकीचे कुठलेही साधन उपलब्ध नाही. यामुळे हे मजूर पायदळ निघाले आहेत. भुकेने व्याकूळ झालेल्या या मजुरांना येथील बायपासवर मदत देण्यात आली.
शिवसेनेने ३० भोजनाचे डबे, प्रा.घनशाम दरणे, अमनभाई, गोधणीचे पोलीस पाटील मंगेश मानकर, सरपंच सुभाष तोडसाम यांनी भोजनासह पाणी, बिस्कीट, चिवडा आदी पदार्थांची व्यवस्था केली होती. भारतीय नारी रक्षा संघटनेचे सुकांत वंजारी, सीमा शेटे, कल्पना राऊत, विनोद दोंदल, गोधणीचे तलाठी व्ही.ए. शेख, आकाश बोरकर, बंटी कांबळे यांनी मदतीचा हात दिला.

Web Title: A helping hand to other state workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.