आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला ‘नाम’चा मदतीचा हात
By Admin | Updated: August 1, 2016 01:04 IST2016-08-01T00:53:51+5:302016-08-01T01:04:53+5:30
तालुक्यातील कारला देव येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त राठोड कुटुंबाला नाम फाऊंडेशनतर्फे १५ हजार रुपयांची मदत प्रदान करण्यात आली.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला ‘नाम’चा मदतीचा हात
पुसद : तालुक्यातील कारला देव येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त राठोड कुटुंबाला नाम फाऊंडेशनतर्फे १५ हजार रुपयांची मदत प्रदान करण्यात आली.
विलास रोडबा राठोड या शेतकऱ्याने १९ मे रोजी जीवनयात्रा संपविली. त्यांच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा आणि पत्नी आहे. पुसद विभागीय नाम समन्वयक स्वप्नील देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी या कुटुंबाची भेट घेवून मदतीचे आश्वासन दिले. मदतीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविल्यानंतर सदर कुटुंबाला नामच्यावतीने विदर्भ खान्देश प्रमुख हरिश इथापे व श्याम पेटकर यांनी प्रस्ताव मंजूर करून १५ हजार रुपयांचा धनादेश पाठविला.
पुसद शहरचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या हस्ते २८ जुलै रोजी सुनीता विलास राठोड यांना धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी शेळके यांनी राठोड कुटुंबाला मार्गदर्शन करून आत्मविश्वास वाढविला. यावेळी आडे, कारला देवचे पोलीस पाटील हरिभाऊ पुलाते, सुधाकर राठोड, नामचे स्वप्नील देशमुख, जितेंद्र नाईक, पवन देशमुख, संजय रेक्कावार, धनंजय देशमुख, शंकर देशमुख, संदीप चौधरी, मनीष दशरथकर, विष्णू धुळे व गावकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)