वृत्तपत्र विक्रेत्यांची गोठे कुटुंबाला मदत

By Admin | Updated: July 29, 2015 02:36 IST2015-07-29T02:36:23+5:302015-07-29T02:36:23+5:30

जिल्हा वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी संस्थेतर्फे येथील गोठे कुटुंबाला ११ हजार रुपयांची मदत देण्यात आली.

Helping the family members of the newspaper vendors | वृत्तपत्र विक्रेत्यांची गोठे कुटुंबाला मदत

वृत्तपत्र विक्रेत्यांची गोठे कुटुंबाला मदत

यवतमाळ : जिल्हा वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी संस्थेतर्फे येथील गोठे कुटुंबाला ११ हजार रुपयांची मदत देण्यात आली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मदतीचा धनादेश उमेश गोठे यांना सुपूर्द केला.
उमेश गोठे यांची मुले जय आणि नेहल हे गेली तीन वर्षांपासून वृत्तपत्र वितरणाचे काम करत होते. दहावीची परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केली. २८ जून रोजी कोटेश्वर येथे दर्शनासाठी गेले असताना या दोघांनाही जलसमाधी मिळाली. उमेश गोठे यांचा ही दोन्ही मुले मोठा आधार होते. या परिस्थितीत मोलमजुरी करणाऱ्या उमेश यांना मदतीचा हात म्हणून वृत्तपत्र विक्रेत्यांनी ११ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोक शिंदे, सचिव किरण कोरडे, मिलिंद इंगोले, किशोर भेदरकर, श्रीराम खत्री, अतुल डोईजड, सचिन येंडे, राजेंद्र शेटे आदी उपस्थित होते. तसेच या कुटुंबाला शासनातर्फे मदत मिळावी यासाठी संस्थेतर्फे पालकमंत्री संजय राठोड यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी यावेळी सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे आश्वासन संस्थेला दिले. (वार्ताहर)

Web Title: Helping the family members of the newspaper vendors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.