लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : फवारणीदरम्यान विषबाधा होऊन मृत्यू झालेले २१ शेतकरी तसेच चार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतीचे धनादेश देण्यात आले. नाम फाऊंडेशनतर्फे व रसिकाश्रय संस्थेच्या माध्यमातून हा कार्यक्रम येथे पार पडला.अध्यक्षस्थानी नामचे विदर्भ व खानदेश समन्वयक हरीश इथापे होते. जिल्हा कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर, स्वामिनी आंदोलनाचे संयोजक महेश पवार, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष विनायक बोदडे, राजकुमार भीतकर, प्रा. घनश्याम दरणे, हरीश भगत आदी उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा समन्वयक नितीन पवार तर संचालन मनीषा काटे यांनी केले. कार्यक्रमासाठी रवी राऊत, प्रशांत भोयर, रितेश सहारे, स्वप्नील देशमुख, मनोज राठोड, आरती खडसे, योगिता फुसे, मनीषा तुरके, प्रतीक्षा वखरे, अनुराधा निवल, संगीता उपाध्ये आदींनी पुढाकार घेतला.संगीता फुलमाळी, अनिता चिलावार, गीता सोनुले, सुनीता राठोड, संगीता मडावी, प्रेमिला पेंदोर, चंद्रकला कोटनाके, वंदना भोयर, छाया राठोड, पूर्णा चव्हाण, रोशनी चव्हाण, अंजूम परवीन शेख अयुब, लक्ष्मी सिडाम, गीता आगलावे, अरुणा घागी, विठाबाई गेडाम, लक्ष्मीबाई पारकेवार, अनिता सोयाम, संगीता टेकाम, लता बावणे, पुष्पा नैताम, मंगला मडावी, सुरेखा टेकाम, चंद्रकला ठावरी आदींना १५ हजार रुपयांची सानुग्रह मदत देण्यात आली.
विषबाधाग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 22:02 IST
फवारणीदरम्यान विषबाधा होऊन मृत्यू झालेले २१ शेतकरी तसेच चार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतीचे धनादेश देण्यात आले.
विषबाधाग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत
ठळक मुद्देफवारणीदरम्यान विषबाधा होऊन मृत्यू झालेले २१ शेतकरी तसेच चार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतीचे धनादेश