शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

हवामान आधारित विम्याची मदत तुटपुंजी

By admin | Updated: February 19, 2015 00:04 IST

राष्ट्रीय पीक विमा कार्यक्रमांतर्गत शासनाने जिल्ह्यात खरीप हंगाम २०१४ मध्ये हवामान आधारित पीक विमा योजना राबविली.

दारव्हा : राष्ट्रीय पीक विमा कार्यक्रमांतर्गत शासनाने जिल्ह्यात खरीप हंगाम २०१४ मध्ये हवामान आधारित पीक विमा योजना राबविली. कापूस, सोयाबीन, मूग, उडीद या पिकांचा विमा उतरविला. शेतकऱ्यांनी कपाशीसाठी ११७९ रुपये, सोयाबीन ८५५ रुपये, मूग ५६४ रुपये आणि उडीदासाठी ७२० रुपये हेक्टरी विमा हप्ता विमा कंपनीकडे जमा केला. मात्र जाहीर झालेली मदत अतिशय तुटपुंजी आहे. विमा कंपनीने नियमाची पायमल्ली केली आहे. विमा कंपनीने शेतकऱ्यांकडून रक्कम भरुन घेतल्यानंतर प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर हवामानाच्या नोंदी तपासण्यासाठी संदर्भ हवामान केंद्र उभारणे नियमानुसार आवश्यक होते. ही व्यवस्था केलीच नाही शिवाय नजीकच्या हवामान केंद्राची आकडेवारी विचारात घेऊनही नुकसान भरपाई निश्चित केली नाही. अपुरा पाऊस, पावसातील खंड, अतिवृष्टी आदी हवामान बदलाच्या नोंदी तपासून महसूल मंडळ निहाय नुकसानभरपाई निश्चित करणे बंधनकारक होते. मात्र कंपनीने या सर्व अटी-शर्थी डावलून तुटपुंजी नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या माथी मारली.तालुक्यातील मांगकिन्ही महसूल मंडळात जूनमध्ये दहा मिमी, जुलै १२७ मिमी, आॅगस्ट १६४, सप्टेंबरमध्ये ९४ आणि आॅक्टोबर महिन्यात शून्य मिमी असा एकूण ३९५ मिमी अत्यल्प पाऊस झाला. या चार महिन्याच्या कालावधीत पावसात अनेकदा खंड पडला. मांगकिन्ही मंडळाच्या हवामान नोंदीच्या आधारे विमा कंपनीस कापूस २२ हजार, सोयाबीन १९ हजार, मूग १५ हजार, उडीद १५ हजार रुपये नुकसानीची रक्कम देय असताना विमा कंपनीने कापूस दोन हजार ३५४, सोयाबीन एक हजार ४२५, मूग ९४७ आणि उडीद एक हजार ४०० रुपये अशी नियमबाह्य नुकसानीची रक्कम मंजूर केली आहे. कंपनीच्या या अन्यायकारक धोरणाविरुद्ध न्यायालयात दाद मागणार असल्याचे भीमराव राठोड यांनी सांगितले. दरम्यान इंदल पवार, धरम जाधव, राजू पवार, अरविंद जाधव, रामराव राठोड या शेतकऱ्यांनीही सदर प्रकाराचा निषेध नोंदविला आहे. (तालुका प्रतिनिधी)