शहरं
Join us  
Trending Stories
1
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
2
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
3
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
4
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
5
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
6
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
7
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
8
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
9
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
10
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
11
कोणी अभिनेता, कोणी लावणी डान्सर तर कोणी राजकारणी; एका क्लिकवर वाचा 'बिग बॉस मराठी ६'मधील स्पर्धकांची संपूर्ण यादी
12
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
13
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
14
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
15
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
16
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
17
Virat Kohli Record : किंग कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा पंच; संगकाराचा महारेकॉर्डही मोडला आता फक्त...
18
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
19
'खूप उशीर होण्यापूर्वी...' व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर ट्रम्प यांची आता 'या' देशाला थेट धमकी
20
IND vs NZ यांच्यातील सामन्यादरम्यान 'रो-को'चा खास सन्मान! चक्क कपाटातून बाहेर आली विराट-रोहित जोडी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर झाड कोसळल्यास मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 23:31 IST

पावसाळ्यात कुठे वादळाने रस्त्यावर झाड कोसळल्यास ते हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून तत्काळ मदत उपलब्ध होणार आहे. यावर्षीपासून शासनाने सुरू केलेल्या द्विवार्षिक देखभाल-दुरुस्ती कंत्राटाचा हा चांगला परिणाम मानला जात आहे.

ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम : द्विवार्षिक देखभाल-दुरुस्ती कंत्राटाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पावसाळ्यात कुठे वादळाने रस्त्यावर झाड कोसळल्यास ते हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून तत्काळ मदत उपलब्ध होणार आहे. यावर्षीपासून शासनाने सुरू केलेल्या द्विवार्षिक देखभाल-दुरुस्ती कंत्राटाचा हा चांगला परिणाम मानला जात आहे.दरवर्षी पावसाळ्यात वादळामुळे वेगवेगळ्या रस्त्यावर झाडे उन्मळून पडतात. कुठे विद्युत पोल आडवे होतात. त्यामुळे तासन्तास वाहतूक ठप्प राहते. अनेकदा रात्रीच्यावेळी अपघातही होतात. आतापर्यंत कुठे झाड पडल्याची माहिती मिळाल्यानंतर बांधकाम अभियंते ते झाड उचलण्यासाठी कंत्राटदार शोधत होते. त्यांची मनधरणी करावी लागत होती, त्या आठ-दहा तास सहज निघून जात होते. तेवढा वेळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होत होती. हे प्रकार टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने आता द्विवार्षिक देखभाल-दुरुस्तीचे कंत्राट दिले आहेत. या दोन वर्षात त्या-त्या मार्गावरील पडलेली झाडे उचलणेच नव्हे तर तातडीने खड्डे भरणे, झाडोरा काढणे आदी कामेही होणार आहे. शुक्रवारी यवतमाळ-दारव्हा रोडवर मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली होती.मात्र द्विवार्षिक कंत्राटामुळे संबंधित कंत्राटदाराने जेसीबीसह घटनास्थळी पोहोचून रस्ता मोकळा करून दिला. पावसाळ्यात जिल्ह्यात राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गावर तातडीने ही मदत मिळणार आहे. इतर जिल्हा मार्ग मात्र जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने तेथे अशा प्रकारची तातडीची मदत मिळविण्यासाठी मात्र पूर्वी प्रमाणेच तासन्तास प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.बांधकाम विभागात ‘वॉर रूम’पावसाळ्यात राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गावर झाड पडणे, पूल खचणे, पोल पडणे या सारखी आपत्ती आल्यास तातडीने मदत मिळावी, म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या यवतमाळ, पुसद, पांढरकवडा, विशेष प्रकल्प विभाग यवतमाळ तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्र. १ यवतमाळ येथे कार्यालयात ‘वॉर रुम’ सुरू करण्यात आले आहे. तेथे बांधकाम अभियंते तैनात राहणार आहे. प्रत्येक वॉर रुममध्ये चार ते पाच जणांना नियुक्त करण्यात आले.५६ कोटींचे कंत्राटयवतमाळ जिल्ह्यात राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गाची लांबी दोन हजार ६६५ किलोमीटर एवढी असून त्याच्या द्विवार्षिक देखभाल-दुरुस्ती कंत्राटाचे बजेट ५६ कोटी रुपयांचे आहे. एकूण ११६ कामांचे कंत्राट यातून देण्यात आले आहे.

टॅग्स :Rainपाऊस