कळंब तालुक्यातील वीज बळीच्या कुटुंबाला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 23:21 IST2017-10-07T23:21:28+5:302017-10-07T23:21:39+5:30

वीज कोसळून ठार झालेल्यांच्या कुटुंबाला शासनातर्फे शनिवारी मदतीचे वितरण करण्यात आले. आमदार डॉ.अशोक उईके यांनी या कुटुंबाची भेट घेऊन प्रत्येकी चार लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश देण्यात आले.

Help in the power victim family in Kalamb taluka | कळंब तालुक्यातील वीज बळीच्या कुटुंबाला मदत

कळंब तालुक्यातील वीज बळीच्या कुटुंबाला मदत

लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : वीज कोसळून ठार झालेल्यांच्या कुटुंबाला शासनातर्फे शनिवारी मदतीचे वितरण करण्यात आले. आमदार डॉ.अशोक उईके यांनी या कुटुंबाची भेट घेऊन प्रत्येकी चार लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश देण्यात आले.
आमला येथील चंदा शंकर रामगडे, तेजस्विनी शंकर रामगडे व मधुकर पुरुषोत्तम कुमरे यांचा वीज पडून मृत्यू झाला. तेजस्विनी ही अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकत होती. तसे पाहिले तर तेजस्विनीचा संबंध शेतापेक्षा पुस्तकांशी जास्त होता. त्यामुळे तिच्यावर कधी शेतात जायची वेळ आली नाही. परंतु वेळ आणि काळ कोणासाठी थांबत नाही म्हणतात, तेच खरे. गावात असल्याने सीतादईसाठी ती शेतात गेली. हे निमित्त तिच्यासाठी शेवटचे ठरले. तेथेच तिचा वीज कोसळून मृत्यू झाला.
निमगव्हाण येथील मंजुळा राऊत हिचाही वीज पडल्याने मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्याही कुटुंबाला शासकीय मदत वाटप करण्यात आली. यावेळी आमदार डॉ.अशोक उईके, तहसीलदार रणजित भोसले, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता मनोहर शहारे, मंडळ अधिकारी पंचबुध्दे, तलाठी विनोद अक्कलवार आदी उपस्थित होते.

Web Title: Help in the power victim family in Kalamb taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.