शेतकऱ्यांची मदत अडली आरोप-प्रत्यारोपात
By Admin | Updated: May 20, 2015 00:06 IST2015-05-20T00:06:57+5:302015-05-20T00:06:57+5:30
शेतकऱ्यांच्या मदतीवरून महसूल आणि कृषी विभागात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.

शेतकऱ्यांची मदत अडली आरोप-प्रत्यारोपात
कलगीतुरा : कृषी आणि तहसील विभागाची टोलवाटोलवी
यवतमाळ : शेतकऱ्यांच्या मदतीवरून महसूल आणि कृषी विभागात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. तहसीलदार म्हणातात, कृषी विभाग सहकार्य करीत नाही. तर दुसरीकडे तहसीलदारांनी याद्याच मागितल्या नसल्याचे कृषी अधिकारी सांगत आहेत. या टोलवाटोलवित शेतकऱ्यांची मदत मात्र रखडली आहे.
जिल्ह्यात २०१३ मध्ये जून ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत शेती खरडून गेली हरेती. त्यांनतर शासनाने मदतीची घोषणा केली. मात्र ही मदत तब्बल दोन वर्षानंतर जिल्ह्यात पोहोचली. मात्र यादी नसल्याचे कारण पुढे करीत तहसीलदारांनी वाटप थांबविले. महसूल प्रशासनाने नुकसानीची यादी कृषी विभागाकडे असल्याचे म्हटले आहे. मात्र ती यादी नसल्याने वाटप रखडल्याचे महसूल विभाग सांगत आहे. महसूल यंत्रणेचा हा आरोप कृषी विभागाने खोडून काढला आहे. मदतीचा निधी कधी आला याची कुठलीही कल्पना कृषी विभागाला दिली नाही. अशा स्वरूपाच्या याद्या कृषी विभागाने मागितल्या नाही. आम्ही या याद्या देण्यासाठी तयार आहोत, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. मग नेमके गणित बिघडले कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
२०१३ मध्ये नुकसानीचे सर्वेक्षण महसूल यंत्रणेने केले होते. तर नुकसानीचा अहवाल कृषी विभागाने दिला होता. दोन्ही विभागाकडे या याद्या असण्याची शक्यता आहे. असे असतानाही कृषी आणि महसूल विभागाच्या वादात वाटपाचा निधी महिन्यापासून रखडला आहे. यात मात्र शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. (शहर वार्ताहर)
लोकमत
विशेष
दुष्काळी मदतीचा पहिला मोर्चा
राज्य शासनाने दिलेली दुष्काळी मदत बेलोऱ्यात पोहोचलीच नाही. या गावातील १०३ शेतकरी मदतीला मुकले आहेत. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले होते. बेलोरा येथील शेतकऱ्यांनी शुक्रवारी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. तसे निवेदन जिल्हा प्रशासनाला सोमवारी सादर केल्याचे ग्रामस्थांच्यावतीने प्रकाश जयस्वाल यांनी सांगितले.