हेल्मेटधारकांना गुलाबपुष्प, टाळणाऱ्यांना दिली चलान

By Admin | Updated: February 25, 2016 02:19 IST2016-02-25T02:19:39+5:302016-02-25T02:19:39+5:30

यवतमाळ शहरात वाहतूक शाखेने हेल्मेट सक्तीसाठी मोहीम राबविणे सुरू केले असून दुसऱ्या दिवशी एका पोलीस अधिकाऱ्यासह १३४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

Helmets give bullets to the helmets, avoid them | हेल्मेटधारकांना गुलाबपुष्प, टाळणाऱ्यांना दिली चलान

हेल्मेटधारकांना गुलाबपुष्प, टाळणाऱ्यांना दिली चलान

हेल्मेट सक्ती : पोलीस अधिकाऱ्यासह १४० वाहनधारकांना दंड
यवतमाळ : यवतमाळ शहरात वाहतूक शाखेने हेल्मेट सक्तीसाठी मोहीम राबविणे सुरू केले असून दुसऱ्या दिवशी एका पोलीस अधिकाऱ्यासह १३४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर हेल्मेट घालून नियमांचे पालन करणाऱ्यांचे वाहतूक शाखेने गुलाब पुष्प देऊन स्वागत केले आहे. पोलिसांच्या या कारवाईने अनेकांची भंबेरी उडाली आहे.
यवतमाळ जिल्हा वाहतूक शाखेच्यावतीने मंगळवारपासून शासकीय कार्यालयासमोर तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. दुसऱ्या दिवशी ही मोहीम अधिक गतिमान करण्यात आली.
बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जीवन विमा कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, स्टेट बँक आॅफ इंडिया, सेंट्रल बँक आदी ठिकाणी वाहतूक पोलिसांचे पथक कार्यालयीन वेळेपूर्वीच दाखल झाले. कार्यालयात येणाऱ्या आणि हेल्मेट नसणाऱ्यांना अडवून त्यांना दंड ठोठावण्यात आला. तब्बल १३४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई आणखी सुरू राहणार असल्याचे जिल्हा वाहतूक शाखेचे प्रमुख दिलीप चव्हाण यांनी सांगितले. (शहर वार्ताहर)

१३ पोलिसांचा समावेश
एकीकडे पोलीस खाते हेल्मेट सक्तीसाठी दंडात्मक कारवाई करीत आहे. तर दुसरीकडे त्याच खात्यातील पोलीस विना हेल्मेट शहरात दुचाकीने फिरत आहे. अशा १३ पोलीस कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे एका पोलीस अधिकाऱ्याचाही यात समावेश आहे. तर ज्या नागरिकांनी हेल्मेट घालून या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद दिला, त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

Web Title: Helmets give bullets to the helmets, avoid them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.