शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
6
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
7
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
10
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
11
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
12
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
13
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
14
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
15
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
16
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
17
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
18
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
20
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा

पुसद तालुक्यात भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: May 5, 2017 02:14 IST

संपूर्ण राज्याला जलक्रांतीचा संदेश देणाऱ्या माजी मुख्यमंत्र्यांचा पुसद तालुका अद्यापही टॅँकरमुक्त होऊ शकला नाही.

सहा गावांसाठी टॅँकरचा प्रस्ताव : २० गावांसाठी विहीर अधिग्रहण प्रकाश लामणे  पुसद संपूर्ण राज्याला जलक्रांतीचा संदेश देणाऱ्या माजी मुख्यमंत्र्यांचा पुसद तालुका अद्यापही टॅँकरमुक्त होऊ शकला नाही. उन्हाळ््याला सुरूवात होताच माळपठारासह गावागावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी सहा गावांना टॅँकरव्दारे पाणीपुरवठा करावा लागणार आहे. तर २० गावात खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहे. तब्बल ७३ लाख ३० हजार रुपयांचा कृती आरखडा मंजूर केला असला तरी उपाययोजना मात्र शून्य आहे. पुसद शहराने राज्याला दोन मुख्यमंत्री दिलेले आहेत. इसापूर आणि पूस धरण या तालुक्यात आहे. मात्र त्यानंतरही दरवर्षी या तालुक्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यंदा म्हैसमाळ, अनसिंग, गौळ मांजरी, उल्हासवाडी, उपनवाडी, बाळवाडी या सहा गावांना टॅँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे. विशेष नळ दुरूस्तीमध्ये पन्हाळा, मारवाडी खु., हिवळणी तलाव, मोख, आमटी, पिंपळगाव ईजारा, फेट्रा, लोहरा इजारा, जवळा, सावरगाव बंगला, फुलवाडी, म्हैसमाळ, इनापूर, माळ आसोली, शिवानगर, रामनगर, माणिकडोह, कारला, आरेगाव खु. आदी १९ गावांसाठी तब्बल ७३ लाख ३० हजार रुपयांचा कृती आराखडा मंजूर केला आहे. तालुक्यातील म्हैसमाळ, रोहडा, मांजर जवळा, गोपवाडी, चिंचघाट, लोभीवंतनगर, बान्सी, ज्योतीनगर, जमनीधुंदी, धनसिंगनगर, बजरंग नगर, लक्ष्मीनगर, चिरंगवाडी, पाथरवाडी, हर्षी, मोखखाड, कुंभारी, बेलोरा बु., नंदपूर आदी २० गावांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण प्रस्तावित आहे. माळपठार भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, गावागावांतील नागरिक पाण्यासाठी भटकंती करीत आहे. प्रादेशिक पाणीपुरवठा योजनाही कुचकामी ठरली असून, नळातूर अपुरे पाणी तेही आठवड्यातून एकदा येत आहे. प्रशासनाने तयार केलेल्या कृती आराखड्यातील उपाययोजनांना अद्यापही प्रारंभ झाला नाही. त्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. पाणीटंचाईच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याची मागणी होत आहे.