शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

अतिवृष्टीचा 829 गावांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2022 05:00 IST

गत १५ दिवसात दीड लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात पिके बाधित झाली आहे. यामध्ये कळंब तालुक्यातील  १३९ हेक्टर, घाटंजी पाच हजार २५३ हेक्टर, राळेगाव सहा हजार ७३२ हेक्टर, आर्णी ७८५ हेक्टर, बाभूळगाव १३६१ हेक्टर, पुसद ४८० हेक्टर, उमरखेड १७ हजार ५६० हेक्टर, महागाव पाच हजार ४७० हेक्टर, पांढरकवडा २१ हजार २२५ हेक्टर, वणी २८ हजार ७६० हेक्टर, मारेगाव १७ हजार ३१६ हेक्टर तर झरी तालुक्यात १७ हजार २८२ हेक्टरला फटका बसला.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात सलग सात दिवस बरसलेल्या पावसाने खरिपाच्या पिकांना झोडपून काढले. निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीने शेतशिवारात शेतकऱ्यांची दाणादाण उडाली. या नैसर्गिक प्रकोपात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दीड लाख पेक्षाही अधिक क्षेत्रात मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने सादर केला आहे. कोट्यवधी रुपयांच्या नैसर्गिक हानीने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यवतमाळ जिल्ह्यात १ ते १४ जुलैपर्यंत मोठ्या पावसाची नोंद झाली आहे. या कालावधीत अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. हे नुकसान भरून न निघणारे असेच आहे. यवतमाळ जिल्ह्यात नदीकाठच्या गावांना सर्वाधिक फटका बसला आहे. कमी वेळात अधिक पाऊस बरसल्याने शेतशिवारात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुरात गाळ वाहून आल्याने उभे असलेेले पीक भूईसपाट झाले. याठिकाणी आता पुन्हा पेरणी करावी लागणार आहे. पेरणीचा कालावधी संपल्याने कुठले पीक घ्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. गत १५ दिवसात दीड लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात पिके बाधित झाली आहे. यामध्ये कळंब तालुक्यातील  १३९ हेक्टर, घाटंजी पाच हजार २५३ हेक्टर, राळेगाव सहा हजार ७३२ हेक्टर, आर्णी ७८५ हेक्टर, बाभूळगाव १३६१ हेक्टर, पुसद ४८० हेक्टर, उमरखेड १७ हजार ५६० हेक्टर, महागाव पाच हजार ४७० हेक्टर, पांढरकवडा २१ हजार २२५ हेक्टर, वणी २८ हजार ७६० हेक्टर, मारेगाव १७ हजार ३१६ हेक्टर तर झरी तालुक्यात १७ हजार २८२ हेक्टरला फटका बसला. यामध्ये कापसाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. ७२ हजार ३१७ हेक्टरला याचा फटका बसला आहे. तर ३९ हजार १७३ हेक्टरवरील सोयाबीनचे पीक भुईसपाट झाले आहे. १० हजार २८६ हेक्टरवरील तूर जळून गेली आहे. 

भाजीपाला आणि फळपिकांना फटका- १५ दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे भाजीपाला कचऱ्याप्रमाणे फेकून द्यावा लागला. सततच्या पावसाने फळपिकांची फुलगळ झाली. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. ही नुकसानभरपाई तत्काळ मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

पावसाने रेकाॅर्ड मोडला - जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्याचा पाऊस सरासरी ओलांडून पुढे गेला आहे. हा पाऊस क्षमतेपेक्षा अधिक असल्याने पिकांच्या वाढीला फटका बसेल. 

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती