शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पुसद तालुक्यात दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 22:49 IST

गत दहा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे शुक्रवारी रात्री दमदार आगमन झाले. मध्यरात्री १२.३० वाजतापासून ४.३० वाजेपर्यंत पुसद शहरासह तालुक्यात धुव्वाधार पाऊस कोसळला.

ठळक मुद्देपूस नदी फुगली : धरणात ३३ टक्के जलसाठा, नदी-नाले खळखळले

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : गत दहा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे शुक्रवारी रात्री दमदार आगमन झाले. मध्यरात्री १२.३० वाजतापासून ४.३० वाजेपर्यंत पुसद शहरासह तालुक्यात धुव्वाधार पाऊस कोसळला. चार तास बरसलेल्या पावसाने शेतकरी सुखावला असून पुसद शहराची जीवनदायिनी पूस नदी दुथडी भरून वाहात आहे, तर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पूस धरणात ३३ टक्के जलसाठा झाला आहे.मृगनक्षत्राच्या सुरुवातीला पुसद तालुक्यात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर १० जूनपासून पावसाने दडी मारली. पेरणी झालेले शेतकरी धास्तावले. सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. अनेकांचे पेरलेले बियाणे अंकुरून जळू लागले होते. या प्रकाराने शेतकरी बेचैन झाले होते. अशातच हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला आणि शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास धुव्वाधार पावसाने हजेरी लावली. वारा शांत असल्याने जलधारांनी वेग घेत काही वेळातच संपूर्ण शहरात पाणीच पाणी झाले. पूस नदी ओसंडून वाहू लागली. यंदा पूस नदीचे खोलीकरण व रुंदीकरण झाल्याने निर्मळ पूस वाहताना पाहून पुसदकरांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. पाऊस आणखी थोडा झाला असता तर पूस नदीच्या पुलावरून वाहू लागले असते. भिलवाडीचा पूल, हत्ती पुलावरून पाणी वाहात होते. तालुक्यातील चोंढी, बान्सी, सावंगी, वनवार्ला, वालतूर रेल्वे, वरूड, सांडवा, मांडवा, बोरी या भागात नदी नाल्यांना पूर आला. अनेकांच्या शेतात पाणी शिरले.पुसद शहरात रात्रभरात ४६ मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत २८० मिमी पाऊस तालुक्यात पडला आहे. पूस धरणात ३३ टक्के जलसाठा झाला आहे. पूस नदीला पहिला पूर आला असून येत्या १५ दिवसात पुसदकरांना नियमित पाणीपुरवठा होईल, असे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पाणीपुरवठा सभापती राजू दुधे यांनी दिली. रात्रीच्या पावसाने चोंढी येथील माजी आमदार विजय पाटील चोंढीकर यांच्या शेतातील हळद पीक वाहून गेले. नदीकाठावरील अनेक शेतात पाणी शिरल्याने बियाणे वाहून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र या पावसाचा फायदा नळयोजनेसह गावातील विहिरींच्या पाणीपातळी वाढण्यात झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.शेतकरी सुखावलेदीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाचे आगमन झाल्याने पुसद तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे. १० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट पसरले होते. मात्र शुक्रवारी रात्री झालेल्या पावसाने शेतकºयांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. या पावसाने पेरणी उलटण्याची भीती नाहिशी झाली असून निघालेल्या बियाण्यांना पोषक होणार आहे.

टॅग्स :riverनदीRainपाऊस