आरोग्य अधिकाऱ्यांची गाडी अडविली

By Admin | Updated: July 7, 2015 01:58 IST2015-07-07T01:58:09+5:302015-07-07T01:58:09+5:30

तालुक्याच्या माटेगाव आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेवक आणि सेविका कधीही मुख्यालयी राहात नाही.

Health officials stopped the train | आरोग्य अधिकाऱ्यांची गाडी अडविली

आरोग्य अधिकाऱ्यांची गाडी अडविली

माटेगाव उपकेंद्र : आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मनमानीचा राग
कळंब : तालुक्याच्या माटेगाव आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेवक आणि सेविका कधीही मुख्यालयी राहात नाही. अनेकदा उपकेंद्रही उघडले जात नाही. या संदर्भात वरिष्ठांकडे वारंवार तक्रारी केल्यानंतरही काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे सोमवारी चक्क तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मंगला उईके यांची गाडी अडवून गावकऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला.
सदर उपकेंद्रातील आरोग्य सेविका एम.एम. थूल आणि आरोग्य सेवक एन.बी. एकोणकार हे कधीही मुख्यालयी राहात नाही. औषधाचे योग्य वाटप केले जात नाही. कामात हयगय केली जाते. या संदर्भात विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे मागील तीन वर्षात नऊ वेळा ग्रामपंचायतीने ठराव घेऊन संबंधितांवर कारवाईची मागणी केली. त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशानुसार तपासणीसाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मंगला उईके या माटेगाव येथे पोहोचल्या. याची माहिती होताच त्यांच्या गाडीला गावकऱ्यांनी घेराव घालून कामात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. तसेच या भेटीमध्ये त्यांना उपकेंद्र चक्क बंद आढळले. येणाऱ्या काळात तत्काळ कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी दिला. याठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Health officials stopped the train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.