आरोग्य, शिक्षणावर सर्वाधिक भर
By Admin | Updated: January 12, 2017 00:49 IST2017-01-12T00:49:25+5:302017-01-12T00:49:25+5:30
नगराध्यक्ष अर्चना मंगाम यांनी आर्णी शहरातील नागरिकांचे प्रश्न आणि समस्या सोडविण्यासंदर्भात केल्या जाणाऱ्या

आरोग्य, शिक्षणावर सर्वाधिक भर
नगराध्यक्ष अर्चना मंगाम करणार शहराचा कायापालट
नगराध्यक्ष अर्चना मंगाम यांनी आर्णी शहरातील नागरिकांचे प्रश्न आणि समस्या सोडविण्यासंदर्भात केल्या जाणाऱ्या उपाययोजनांविषयी ‘लोकमत’शी चर्चा केली. शहरवासीयांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जाईल. पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न केले जाईल. शहराच्या काही भागामध्ये पथदिवे नाहीत. पुढील काही दिवसात प्रत्येक चौक आणि परिसर पथदिव्यांमुळे उजळून निघेल, असा विश्वास त्यांनी दिला. महत्त्वाच्या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाईल. प्रत्येक चौकात महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह उभारण्यात येईल. मोकाट जनावरांमुळे वाहतुकीची कोंडी होते. काहीप्रसंगी अपघातही होतात, त्यामुळे या जनावरांचा बंदोबस्त केला जाईल. नगरपरिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न राहील. शिक्षकाची पत्नी असल्याने ती आपली पहिली जबाबदारी असेल, असे त्या म्हणाल्या. पालिकेच्या शाळांमध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविल्या जाईल. सत्ताधारी, विरोधक आणि जनतेच्या सहकार्याने शहराचा विकास केला जाईल. प्रत्येक समस्या मार्गी लावून शहराचा कायापालट करण्यात येईल, असे नगराध्यक्ष अर्चना मंगाम यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
सामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य - उपाध्यक्ष राजीव वीरखेडे
आर्णी शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याला आपले प्राधान्य राहणार असल्याचे नगरपरिषदेचे उपाध्यक्ष राजीव वीरखेडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. शहरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न आणि अग्निशमन दलाचे वाहन शक्य तितक्या लवकर उपलब्ध करून घेतले जाईल. शहरातील आठवडी बाजार आणि मुख्य रस्त्याच्या बाजूला बसून व्यवसाय करणाऱ्यांसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील. गरजूंना शासकीय नियमानुसार घरकूल देण्यात येईल. शहर स्वच्छ आणि सुंदर व्हावे यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाईल. उद्यानाची निर्मिती करण्यात येईल. आवश्यक त्या ठिकाणी प्रसाधनगृह उभारले जाईल. पालिकेतील पदाधिकारी, सदस्य आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने शहर विकास साधला जाईल.