दारव्हा येथे पोलीस कर्मचारी, होमगार्डची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:01 IST2020-04-28T05:00:00+5:302020-04-28T05:01:08+5:30
ठाणेदार मनोज केदारे यांच्या पुढाकारात येथील उपजिल्हा रुग्णालयात विशेष आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी ७१ जणांची तपासणी केली. जिल्हासीमा नाकाबंदी, अलर्ट पॉईंट, शहर व ग्रामीण भागात २४ तास पेट्रोलिंग यासह नियमित कामे पोलिसांना करावी लागत आहे. त्यामुळे दगदगीचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर सध्या कोरोनाच्या रुग्णसंखेत वेगाने भर पडत आहे. अशावेळी पोलीस कर्मचारी अनेकांच्या संपर्कात येतात. त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शनिवारला उपजिल्हा रुग्णालयात विशेष शिबिर घेण्यात आले.

दारव्हा येथे पोलीस कर्मचारी, होमगार्डची आरोग्य तपासणी
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : लॉकडाऊनमध्ये चोख अंमलबजावणीसाठी दिवसरात्र परिश्रम घेणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर त्यांना आपले आरोग्य जपण्यासाठी कोणते उपचार आणि खबरदारी घ्यावी लागेल, याची माहिती देण्यात आली.
ठाणेदार मनोज केदारे यांच्या पुढाकारात येथील उपजिल्हा रुग्णालयात विशेष आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी ७१ जणांची तपासणी केली. जिल्हासीमा नाकाबंदी, अलर्ट पॉईंट, शहर व ग्रामीण भागात २४ तास पेट्रोलिंग यासह नियमित कामे पोलिसांना करावी लागत आहे. त्यामुळे दगदगीचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर सध्या कोरोनाच्या रुग्णसंखेत वेगाने भर पडत आहे. अशावेळी पोलीस कर्मचारी अनेकांच्या संपर्कात येतात. त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शनिवारला उपजिल्हा रुग्णालयात विशेष शिबिर घेण्यात आले.
यावेळी ठाणेदार मनोज केदारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल सांगळे, प्रवीण लिंगाडे, पोलीस उपनिरीक्षक धोत्रे यांच्यासह ५४ पोलीस कर्मचारी, १३ होमगार्ड यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉ.गजानन खरोडे, डॉ.अभय मांगे, डॉ.सलीम कुरेशी तसेच पथकातील कर्मचारी अनिल गोकुळे, नरसिंह चव्हाण, अश्विनी नैताम, प्रवीण नगराळे, विशाल मनवर यांनी मार्गदर्शन केले. तहसीलदार संजय जाधव, मुख्याधिकारी धीरजकुमार गोहाड, गटविकास अधिकारी राजीव शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी बानोत आदींनी शिबिराला भेट देऊन स्वत: तपासणी करून घेतली.