भांबोरा येथे आरोग्य अभियान
By Admin | Updated: March 14, 2015 02:13 IST2015-03-14T02:13:21+5:302015-03-14T02:13:21+5:30
भांबोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने गुरूवारपर्यंत महिला आरोग्य अभियान राबविण्यात आले.

भांबोरा येथे आरोग्य अभियान
यवतमाळ : भांबोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने गुरूवारपर्यंत महिला आरोग्य अभियान राबविण्यात आले. महिलांचे आरोग्य सुदृढ रहावे, माता-बाल दगावण्याचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने हे अभियान राबविण्यात आले आहे.
अभियानाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य उषाताई राठोड, भांबोराचे सरपंच अशोक मेश्राम, डॉ. उमरे आदींच्या उपस्थितीत पार पडले. संपूर्ण अभियान महिलांना केंद्रबिंदू माणून राबविण्यात आले. पंधरवड्यादरम्यान सिकलसेल तपासणी, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर, आरोग्य शिक्षण, वृक्ष लागवड, बालकांचे लसिकरण, किशोरी मुलीची तपासणी आदी उपक्रम राबविण्यात आले असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ईश्वर वातिले यांनी कळविले.
पंधरवड्यात राबविल्या गेलेल्या विविध उपक्रमांसाठी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांसह गावकऱ्यांचीही चांगले सहकार्य लाभले. (वार्ताहर)