अपघातात मुख्याध्यापिका ठार
By Admin | Updated: February 9, 2017 00:20 IST2017-02-09T00:20:18+5:302017-02-09T00:20:18+5:30
भरधाव अज्ञात कारची मोटरसायकलला धडक बसून मुख्याध्यापिका ठार तर शिक्षक पती जखमी झाला.

अपघातात मुख्याध्यापिका ठार
शिक्षक पती जखमी : भारीजवळ अज्ञात कारची दुचाकीला धडक
यवतमाळ : भरधाव अज्ञात कारची मोटरसायकलला धडक बसून मुख्याध्यापिका ठार तर शिक्षक पती जखमी झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास नागपूर मार्गावरील भारी गावाजवळ घडली.
भारती अजित काळे (४०) असे मृताचे नाव आहे. शिक्षक अजित काळे रा. गुरुकृपानगरी यवतमाळ हे जखमी आहे. भारती काळे या कामठवाडा (ता. कळंब) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका होत्या. अजित काळे हे कळंब येथील शिवशक्ती शाळेवर शिक्षक आहे. बुधवारी शाळा सुटल्यानंतर हे दाम्पत्य मोटरसायकलने यवतमाळकडे येत होते. दरम्यान भारीनजीकच्या एका जिनिंगजवळ मोटरसायकलला अज्ञात कारची धडक बसली. या अपघातात भारती काळे (भोरे) या जागीच ठार झाल्या. अजित काळे यांंना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास यवतमाळ पोलीस करीत आहे. (वार्ताहर)