नेरमधील ढाबे बनले अवैध धंद्यांचे माहेरघर

By Admin | Updated: June 2, 2015 00:13 IST2015-06-02T00:13:21+5:302015-06-02T00:13:21+5:30

तालुक्याच्या प्रमुख मार्गावर असलेले ढाबे अवैध धंद्यांचे मोहरघर बनले आहे.

The head of the Nair became the headquarters of the illegal trade | नेरमधील ढाबे बनले अवैध धंद्यांचे माहेरघर

नेरमधील ढाबे बनले अवैध धंद्यांचे माहेरघर

पोलिसांची मूकसंमती : आर्थिक व्यवहाराचा संशय
नेर : तालुक्याच्या प्रमुख मार्गावर असलेले ढाबे अवैध धंद्यांचे मोहरघर बनले आहे. परवाण्याशिवाय याठिकाणी दारू विक्री केली जाते. शिवाय ढाबा बंद करण्यासाठी कुठलेही नियम पाळले जात नाही. या प्रकाराला पोलिसांचीच मूकसंमती तर नसावी, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. कुठल्याही ढाब्यावर कारवाई होत नसल्याने या प्रश्नाला बळ मिळत आहे.
तालुक्यातून जाणाऱ्या जवळपास सर्वच प्रमुख मार्गांवर ढाब्यांची गर्दी वाढली आहे. दिवसभर रिकामे दिसणारे ढाबे रात्री फुल्ल होतात. रात्री ९ वाजतानंतरची गर्दी अनेक प्रश्नांना जन्म देणारी आहे. शहर आणि परिसरातील काही लोकांची अशा ढाब्यांवर नेहमीच ऊठ-बस असते. शिवाय रात्री त्यांचा ठिय्या असतो. या ढाब्यांवर अवैधरीत्या दारूची विक्री करण्यासोबतच मटका, जुगारही खेळला जातो. या प्रकारात काही लोकांमध्ये वादाचे प्रकारही घडतात. ढाब्यावर बसण्यासाठी कुठल्याही वेळेचे बंधन नाही. मटका, जुगार खेळणारे जोपर्यंत उठणार नाही तोपर्यंत ढाबा चालकही आपल्या ढाब्याच्या झडपा पाडत नाही.
रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या या ढाब्यांवर पोलिसांची नजर कशी जात नाही, हा प्रश्न आहे. शहरालगत तसेच गावापासून दूर अंतरावर मात्र नेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या परिसरात रात्री १२-१ वाजतापर्यंत ढाबे सुरू असतात. वास्तविक १० वाजताच ही दुकानदारी बंद व्हायला पाहिजे. मात्र पोलिसांकडूनच कारवाई होत नसल्याने ढाबा चालकांचे चांगलेच फावत आहे. स्थानिक वरिष्ठ पोलिसांचेही या बाबीकडे ‘दुर्लक्ष’ सुरू आहे. जिल्हा ठिकाणचे पथकही कधी कारवाई करत नाही. ढाबा चालकांची पोलिसांशी असलेली जवळीक ही या बाबीला कारणीभूत ठरत आहे. कारंजा मार्गावरील एक ढाबा तर रात्री ९ वाजतानंतर विशेष सजविला जातो. विशिष्ट प्रकारची गाणी या ढाब्यावर वाजविली जातात. या गाण्यांवर डोलणाऱ्यांची संख्याही अधिक असते. पोलीस विभागाच्या वरिष्ठांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे. शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता कारवाई होणे अपेक्षित आहे. (तालुका प्रतिनिधी)

हॉटेलचालकांनीही गुंडाळले नियम
नेर शहर आणि तालुक्यात असलेल्या हॉटेलमध्येही नियमांचे पालन केले जात नाही. रात्री हॉटेल बंद करण्याची वेळ ठरलेली असताना उशिरापर्यंत ती सुरू असतात. यावरही कारवाई करण्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष सुरू आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

Web Title: The head of the Nair became the headquarters of the illegal trade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.